-->
किरकोळ वादातून मारहाण; गुन्हा दाखल.

किरकोळ वादातून मारहाण; गुन्हा दाखल.


साप्ताहिक "जनता की आवाज"
    वृत्तपत्र प्रतिनिधी
 
तुमसर :- वाहन थांबविण्यावरून झालेल्या वादातून मारहाण करून जीवे मारण्याची चमकी दिल्याप्रकरणी तुमसर पोलिसांनी गणेश बर्षे (वय अंदाजे ५८, रा. तुमसर) यांच्यासह संबंधित व्यक्तींविरुद्ध तक्रारीनुसार कारवाई केली आहे. आकाश देवचंद चिंधालोरे (वय ३४, रा. श्रीरामनगर, तुमसर) हे १४ सप्टेंबर रोजी दुचाकीने

जात असताना स्मार्ट बाजारसमोर चारचाकी वाहनाचा दरवाजा उघडण्यावरून वाद झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात कलम ११८ (१), ३५१ (२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

0 Response to "किरकोळ वादातून मारहाण; गुन्हा दाखल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article