केकऐवजी वृक्षारोपण; निसर्गाच्या सान्निध्यात साजरा, रजत राऊत यांचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार.
शुक्रवार, 9 अक्टूबर 2026
Comment
संजीव भांबोरे साप्ताहिक
"जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील,पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर समितीच्या परिसरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमातून लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी लोक परिवर्तन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष यांच्या शाल व श्रीफळ देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पहेला येथे सत्कार करण्यात आला. व त्यांनी वृक्षारोपण केलेल्या रोपट्याचे जतन करण्याची जबाबदारी जबाबदारी आपली असल्याचे मत यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले होते.
याच उपक्रमाची प्रेरणा घेत लोकपरिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रजत के. राऊत यांनी आपल्या ६ ऑक्टोबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त या वृक्षांसोबत वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता निसर्गाशी जोडत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी वृक्षांच्या महत्त्वाबाबत बोलताना एक हृदयस्पर्शी विचार व्यक्त करण्यात आला— “आपल्या परिवारातील एखादा सदस्य लोभापोटी किंवा स्वार्थापोटी बदलू शकतो; मात्र वृक्ष कधीच स्वार्थी होत नाही. वृक्ष कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला समान सावली, सान्निध्य आणि प्राणवायू देतो.”
वृक्ष स्वतः उन्हात उभा राहून इतरांना सावली देतो, फळे देतो, प्राणवायू देतो आणि पर्यावरणाचे रक्षण करतो. त्यामुळे वाढदिवसानिमित्त वृक्षांची काळजी घेणे आणि त्यांचे संगोपन करणे, हीच निसर्गाप्रती खरी कृतज्ञता असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
“माझा वाढदिवस, माझे झाड” या भावनेतून साजरा करण्यात आलेला हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच समाजात निसर्गप्रेमाची भावना रुजविणारा ठरला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, सोपान खोब्रागडे, अर्पित मेश्राम, विशाल आकरे, बाळू जिभकाटे, अमोल भुरले,जालिंदर दहिवले, रोशन वालदेकर, व अन्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
0 Response to "केकऐवजी वृक्षारोपण; निसर्गाच्या सान्निध्यात साजरा, रजत राऊत यांचा पत्रकार संजीव भांबोरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार."
एक टिप्पणी भेजें