भंडाऱ्यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या.
शुक्रवार, 9 अक्टूबर 2026
Comment
न्यूज नेटवर्क
•पालक मंत्र्यांनी सर्वांनी च शेतकऱ्यांची दखल घेतली असती तर हे घडले नसते.
भंडारा/तुमसर :- मोहाडी नालुक्यातील आंधळगावजवळील
चोप येथे दुष्काळाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्याने विहिरीत आत्महत्या धक्कादायक केल्याची घटना आज दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. राजेंद्र अंबर सपाटे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर मोहाडी नालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पाच शेतकऱ्याने पालकमंत्र्यांसमोर डत रडत दुष्काळाची व्यथा मांडत आपल्या अडचणीचा टाहो फोडला होता.
दुष्काळामुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची व्यथा संबंधित शेतकऱ्याने पालकमंत्र्यांसमोर मांडली होती. मात्र त्यानंतरही शेतकर्याला अपेक्षित मदत मिळाली नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. व्यथा मांडल्यानंतर अवघ्या काही दिवसांनंतर राजेंद्र पपाटे यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने प्रशासनाच्या मदतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आज सकाळी राजेंद्र सपाटे पांचा मृतदेह विहिरीत आढळून
आठवड्याभरापूर्वी दुष्काळाची व्यथा मांडली अन् आज विहिरीत मृतदेह सापडला...
एकच आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी पोलिसांसह प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र काही दिवसानंतर त्याच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
पालकमंत्री वेळेवर दखल घेतली असती तर कदाचित घडले नसते.
मोहाडी तालुक्यात तिव्र दुष्काळ सदृष्य परिस्थिती असतानाही शासनाकडून अद्याप तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आलेला नाही. केवळ ग्राऊंडलेव्हल ट्यूनिंग सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले गेले. जर शासनाने तातडीने दुष्काळ जाहिर केला असता तर कदाचित या शेतकरी राजाला जगण्याची नवी आशा मिळाली असती, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. रांजेद्र सपाटे यांच्याकडे साडेचार एकर शेती आहे. त्यांचा शेती हाच जगण्याचा एकमेव आधार होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाने आणि सततच्या दुष्काळाने त्यांचे कंबरडे मोडले होते. पीके हातची गेल्यामुळे आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा या विंवचणेतून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.पालकमंत्र्यांनी कधीच शेतकऱ्याची व्यथा ऐकून वेळेवर दखल घेतली असती तर कदाचित हे घडले नसते.असा जिल्ह्यातील ग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .
0 Response to "भंडाऱ्यात पालकमंत्र्यांसमोर रडत रडत व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या."
एक टिप्पणी भेजें