-->
तुमसर-खापा चौफुलीवर सिलिंडरच्या ट्रकने एसटी बसला दिली धडक.

तुमसर-खापा चौफुलीवर सिलिंडरच्या ट्रकने एसटी बसला दिली धडक.


• चौफुलीवर स्थानिक प्रतिनिधी सा.बा.वि.भं.,
रा.मा.वि., भंडारा वाहतूक विभागने मार्ग मोकळा करुन लक्ष देण्याची गरज..

      दिगंबर देशभ्रतार 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- तालुक्यातील खापा चौफुलीवर तुमसरकडून भंडाऱ्याला जाणाऱ्या एसटी बसला भंडारावरून तिरोड्याला जात असलेल्या एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली या सदर धडकेत एसटी बसचे जबर नुकसान झाले.
तुमसर भंडारा या बसमध्ये मोहाडी येथील औद्योगिक विद्यालयाचे विद्यार्थी व प्रवाशी होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल परीक्षा होती, परंतु सदर दुर्घटना घडल्याने वेळेवर पोहोचता आले नाही. त्यादरम्यान एसटी बसचे अधिकारी व पोलीस सुमारे दोन तासानंतर घटनास्थळी हजर झाले. त्या बसमधील विद्यार्थ्यांना पर्याय व्यवस्था प्रस्तुत प्रतिनिधी व काही नागरिकांनी करून दिली तर काही विद्यार्थी मागील येणाऱ्या बसमधून पुढचा प्रवास केला. मात्र वाहक मोरे यांनी माणुसकी आणि सौजन्यता प्रवाश्यांशी दाखवली नाही, उलट प्रवासांना उर्मट व उद्धट वागणूक दिल्याचे नागरिकांना जाणवले.

सदर धडक इतकी जबर होती. बसमध्ये बसलेले विद्यार्थी थोडक्यात बचावल्याची घटना गुरुवारला सकाळी ८ वाजेच्या दरम्यान खापा चौफुलीवर घडली.

तुमसर आगाराची तुमसर भंडारा बस एम. एच. ०६/एस. क्रमांक ८९८७भंडाराकडून तिरोडाकडे एलपीजी सिलिंडर भरून जात असलेल्या ट्रक क्रमांक एम. एच. ४९-०७५६ ने जबर धडक दिली. बसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. सदर सिलेंडरचे ट्रक अपघात करून पळून गेला. सदर चौफुलीवर चारही कोपऱ्यावर पानटपरीवाल्यांनी चक्क सडकेवर जागा माखल्याने अपघात होण्याला कारणीभूत ठरत आहे. 
त्यामुळे येथील स्थानिक प्रतिनिधी व सबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय वाहतूक विभाग ही भग्याची भूमिका घेत असून येथील चौफुली वाहतूक रस्त्यावरील निमा अंतर्गत कार्यवाही करून वाहतूक रस्ता मोकळीस करण्याची लक्षपुर्वक गरज आहे.

भंडारा सदर वाहतूक खात्याने चौफुलीकरिता अंदाजे ६ वाहतूक कर्मचारी दिले आहे. परंतु त्यांच्या उपयोग शहरात करून घेत असल्याने चौफुली वरील संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे.

चौफुलीवर दिवसेंदिवस अपघाताचे अति प्रमाण वाढले आहे त्यामुळे जिल्हा वाहतूक खात्याने एक वर्षापूर्वी खापा येथे वाहतुकीचे उपकेंद्र दिले असून त्यामध्ये ६ कर्मचारी आहेत. परंतु त्यांच्या उपयोग तुमसर शहरात होत असल्याने चौफुलीवरील वाहतूक व्यवस्था फार मोडकळीस आली आहे. चौफुलीवर आळीपाळीने दोन वाहतूक कर्मचारी नियमित ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

0 Response to "तुमसर-खापा चौफुलीवर सिलिंडरच्या ट्रकने एसटी बसला दिली धडक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article