-->
दीक्षाभूमीवर अन्नदान, प्रश्नमंजुषा स्पर्धा व वैचारिक पुस्तकांचे वितरण.

दीक्षाभूमीवर अन्नदान, प्रश्नमंजुषा स्पर्धा व वैचारिक पुस्तकांचे वितरण.



• केंद्रीय मानवाधिकार संघटनेचा उपक्रमः डॉ. बाबासाहेब   आंबेडकरांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार.

साप्ताहिक "जनता की आवाज" 
     वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- ७० व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्लीच्या महाराष्ट्र राज्य, भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरात अन्नदान,
.  मा.जिल्हा मा.अ.स्वेता राउत,डां.नंदागवळी,चवरे,रगांरी

 मानवतावादी महापुरुषांच्या वैचारिक पुस्तकांचे निःशुल्क वितरण आणि बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा-२०२६ अशा विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांनानागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भारतरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीच्या पावन दिनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.

या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीला अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना मदतीचा हात देणे, त्यांच्या सेवेत योगदान देणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने संघटनेने अन्नदान व वैचारिक पुस्तकांचे निःशुल्क वितरण केले.

संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समता, शांती आणि अहिंसेचा संदेश संपूर्ण जगाला देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच अन्य मानवतावादी महापुरुष यांच्या जीवनकार्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा-२०२६ आयोजित करण्यात आली. या परीक्षेत बहुसंख्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थीचा मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रती आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करणाऱ्या पुस्तकांचे वितरण करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आणितथागत गौतम बुद्धयांच्या छायाचित्रांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले, माहिती व प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली भारत सरकारशी संबंधित हंसराज राऊत, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता राऊत, राष्ट्रीय प्रबोधनकार अजय पात्रे आणि शरद सोनकुळे यांची विशेष उपस्थिती होती.

धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून अन्नदान, शैक्षणिक प्रबोधन, संविधान जागृती आणि वैचारिक साहित्याचा प्रसार यांचा सुंदर संगम साधण्यात आला.

0 Response to "दीक्षाभूमीवर अन्नदान, प्रश्नमंजुषा स्पर्धा व वैचारिक पुस्तकांचे वितरण."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article