आयडिसीटी.कम्प्युटर साकोली द्वारा प्रवेश परीक्षा घेण्यात आली.
गुरुवार, 1 अक्टूबर 2026
Comment
युगांतर बारसागळे
साप्ताहिक "जनता की आवाज"
साकोली :- शहरात असलेले आयडीसीटी कम्प्युटर च्या माध्यमातून दरवर्षी राज्यस्तरीय कौशल्य विकास अभियान अंतर्गत शिकत असलेले सर्व विद्यार्थी गृहणी करिता प्रवेश परीक्षा घेण्यात येते.
या परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आयडीसीटी कम्प्युटरमध्ये कमी फीस मध्ये शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते तसेच जे विद्यार्थी कोर्स पूर्ण करतात त्या सर्व विद्यार्थ्यांना नाममात्र फीस मध्ये कंप्यूटर सेट देण्याचे काम आयडीसीटी कम्प्युटर करत आहे.
27/09/2026 रविवारला ही परीक्षा कृष्ण मुरारी कटकवार हायस्कूल साकोली मध्ये घेण्यात आली परिक्षा घेताना सेंटरचे पर्यवेक्षक प्रवीणजी टेंभुर्णीकर, आयडीसीटी कम्प्युटरचे डायरेक्टर कोयल टेंभुर्णीकर मॅडम आणि केन्द्रातील शिक्षक उपस्थित होते विशेष माहितीसाठी गुरुकुल पॅरामेडिकल कॉलेजचे संस्थापक प्रवीण जी खोब्रागडे सर तसेच शिवराज्य वक्ता अकॅडमी येथील जितेंद्र जी मेश्राम सर यांच्या देखरेख मध्ये 300 + विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
परीक्षा नीटनेटकी घेण्यात आली त्याकरिता कृष्ण मुरारी कटकवार हायस्कूल साकोली मधील प्रिन्सिपल मॅम मनीषा काशीवार मॅम यांनी सर्वांचे कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याची शुभेच्छा दिल्या..
0 Response to "आयडिसीटी.कम्प्युटर साकोली द्वारा प्रवेश परीक्षा घेण्यात आली."
एक टिप्पणी भेजें