कवी समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर यांच्या सत्कार.
बुधवार, 28 अक्टूबर 2026
Comment
• कवी समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर.यांच्या स्व:पत्नीक सत्कार.
साप्ताहिक "जनता की आवाज़"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- लेखक समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर यांचा स्व:पत्नीक साप्ताहिक "जनता की आवाज" चे मुख्य संपादक समाजसेवक श्रीकृष्ण देशभ्रतार व वृत्तपत्र समुह द्वारे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन सम्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रात चालत असलेल्या विविध घडामोडी वर चर्चा करुन सुशिक्षित बेरोजगार शेतकरी शैक्षणिक विध्यार्थी पेपरफुटी प्रकरणावर चिंता व्यक्त केली.त्याचप्रमाणे धर्मवाद,जातीवाद, महापुरुष,स्त्री विटंबना,पक्षपाती विष फैलवून लोकशाहीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन संवैधानिक दृष्टीकोन बदलवून भांडवलशाही वर्ग निर्माण करून मनुव्यावस्था भगवाकरन लागू करणे हे सत्ताधारी धोरण आहे.असे मत व्यक्त केले.
तसेच शरद पोर्णिमा च्या पर्वावर वर्षावास बौद्ध धम्म एक परिवर्तन विज्ञाननिष्ट असून विवेकवादि आहे.बुध्दाचं तत्वज्ञान म्हणजे नैतिक शांती व अन्यायाला विरोध करणे नाही तर समानतेची प्रेरणा होय. तसेच दलित पैथंर आंबेडकर चळवळीच्या आठवणी ला उजाळा देत."साप्ताहिकालाा" सदिच्छा देताना म्हणाले की वृत्तपत्र समाजाच्या आरसा आहे.तो सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्रांती घडवून अन्याय,अत्याचारा प्रति लढण्याची प्रेरणा मिळते. म्हणून समाजात वृत्त पत्राची गरज असल्याचे त्यांनी सामाजिक मत व्यक्त केले.
हर्षवर्धन देशभ्रतार वुत्त टेक्निसीयन, कु. वेदांती देशभ्रतार, कु. प्राजक्ता देशभ्रतार, सुनिल रामटेके, दिलीप बुरडे, युगांतर बारसागडे, विजय बरेकर, सचिन ढोके, वासनिक उपस्थित होते. संचालन सौ.मंजुषा देशभ्रतार तर आभार प्राजक्ता देशभ्रतार यांनी केले.
0 Response to "कवी समीक्षक प्रभाकरजी सोमकुवर यांच्या सत्कार."
एक टिप्पणी भेजें