-->
चुलबंद नदीपात्रात वाळूचोरी; १६ लाखांचे दोन ट्रॅक्टर जप्त.

चुलबंद नदीपात्रात वाळूचोरी; १६ लाखांचे दोन ट्रॅक्टर जप्त.


• चालक-मालकांसह चौघांविरुद्ध कारवाई.

नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

 लाखनी :- तालुक्यातील वाकल येथील चुलबंद नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रकार पालांदूर पोलिसांनी उघडकीस आणला. सोमवारी (ता. २६) सायंकाळी केलेल्या कारवाईत दोन ट्रॅक्टर ट्रॉलींसह जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे १६ लाख सहा हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक खेडेराव बोळगीर हे सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना नदीपात्रात वाळूचोरी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसह घटनास्थळी धाड टाकली असता, दोन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत वाळू भरली जात असल्याचे आढळले. संबंधितांकडे उत्खनन व वाहतुकीचा

परवाना नसल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांनी स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ३० बीबी ३१६२) आणि आयशर कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच ३६ एल १५८१) ट्रॉलींसह जप्त केले. वाळू भरण्यासाठी वापरण्यात येणारे दोन लोखंडी पावडे आणि दोन प्लास्टिक घमेले ताब्यात घेण्यात आले. एका ट्रॉलीत सुमारे एक ब्रास वाळू आढळली.

या प्रकरणी प्रतीक देवेंद्र राखडे (२३), रवींद्र प्रभू बावणे (४०), हेमराज सखाराम बेले (४२) आणि आशीष किशन गजभे (३०), सर्व रा. वाकल, यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील एका चालकाकडे वाहन चालविण्याचा परवानाही नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास पालांदूर पोलिस करीत आहेत.

0 Response to "चुलबंद नदीपात्रात वाळूचोरी; १६ लाखांचे दोन ट्रॅक्टर जप्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article