-->
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..


 
झाडे लावा, झाडे जगवा हे शासनाचे स्लोगन फक्त लोकांना दिलेले आदेश आणि कागदावर होणारी प्रक्रिया एवढेच स्लोगन चे महत्व आहे का ???? हा प्रश्न मला , तुम्हाला आम्हा सर्वांना पडणे भाग आहे..

       निसर्ग रम्य वातावरणात माणूस सुखावून जातो ,मन प्रफुल्लित होते,मणांचा ताण कमी होतो आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे माणसाला जगण्यासाठी ज्या वायूंची गरज असते ते आँक्सीजन वायु या निसर्गात वृक्षांपासून विनामुल्य मिळते..
यानिमित्ताने आठवण झाली त्या कोरोणा काळाची ..
त्या काळात लोकं आँक्सीजन न मिळाल्यामुळे मरत होती.तर कित्येक जण झाडाखाली आँक्सीजन सिलेंडर घेऊन बसतांना पण बघितले.सोईसुविधा कितीही असल्या तरी जे निसर्गातून मिळते त्याला तोड नसते..

या आधी सुद्धा आरे.. कॉलनीतील असंख्य झाडे तोडण्यात आली होती.
विकासाच्या नावाखाली नविन काहीतरी उभारण्यासाठी जे आहे त्याला नष्ट करून काही नविन उभारणं आणि निसर्गाची संपत्ती आहे तिला नेस्तनाबूत करायचं हा कुठला विकास....
 ज्या वृक्षामुळे अडचणी निर्माण होत असतील तर वृक्ष तोडणे हे समजू शकतो..

पण एखादा प्रोजेक्ट उभारण्यासाठी पुर्ववत, असलेली निसर्ग संपत्ती तिला नुकसान कशाला???
भिमाशंकर अभयारण्य ,पर्यटन स्थळ व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे अभयारण्य आहे. टोरेंटो प्रोजेक्ट करीता कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहेत आणि त्यामुळे तिथल्या मूळ आदिवासी, स्थानिक आणि जना-वनावर अवलंबून असणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सगळे मोठे प्रोजेक्ट आणि प्लान्स गुजरातच्या बिझनेसमनला दिले जात आहेत, असा आरोप स्थानिक करत आहेत.

 मग महाराष्ट्राच्या जनतेने जायचं कुठे? ?? 

जंगलात वास्तव्य असणा-या पशू ,पक्षी यांचे काय??
तिथल्या स्थानिक लोकांची उपजीविका जंगलावर अवलंबून असेल तर त्याचे काय???  मग प्रोजेक्ट सुरु झाल्यावर स्थानिकांना रोजगार मिळेल का??? ज्या पक्ष्यांचे घरटे आज जंगलतोडीमुळे मोडले गेले त्याचं काय?? तिथे वास्तव्यास असणाऱ्या प्राण्यांचे काय ??? अनावश्यक वृक्ष तोडीला कुणी च काही म्हणणार नाही .पण या वृक्षतोडीमुळे विनाश होत असेल तर येणा-या काळासाठी धोकादायक आहे.निसर्गरम्य परिसराला का वाळवंट करु पाहत आहेत. झाडामुळे पाऊस पडण्याची शक्यता असते.असे आम्हाला पूर्वि शिकवले गेले.आज शेतकरी शेतीला पाणी मुबलक मिळावा यासाठी अनेक प्रयत्नात असतो.पाऊस न पडल्यामुळे कोरडा दुष्काळ पडतो.आधीच शेतक-यांची अवस्था दयनिय आहे.

त्यांच्यासाठी एकही असे प्रोजेक्ट शासनाकडे नाहीत का???
बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी असे उद्योग धंदे ,कंपन्या का उभारत नाही..
अरे माणसा विकासाच्या नावाखाली 
का कुणाचे घरटे उध्वस्त करतोस,
का मुक्या प्राण्यांना जखमी करतोस.
पैसाच कमवायचा असेल तर अन्य ठिकाण शोध,
*बेरोजगारांना रोजगार मिळेल असं काही कर*
शेतकरी आत्महत्यां करणार नाही यासाठी काहीतरी कर.
शेवटी सर्वांना दफनविधी साठी वितभरच जागा लागते आणि स्मशानभूमी सर्वांची सारखीच असते.

आज आपण पक्ष्यांची घरटे उध्वस्त करतो,
आपलं घरटं टिकेल का.. निसर्ग कोपरा तर माणूस केव्हा उध्वस्त होईल हे कळणार पण नाही.

                  प्रा.सुनिता टेंभूर्णे 
               .    तुमसर , भंडारा

0 Response to "वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article