-->
डॉ.गायत्री रामटेके यांनी माता शारदा उत्सवात केला. महामानवाच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर.

डॉ.गायत्री रामटेके यांनी माता शारदा उत्सवात केला. महामानवाच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर.


         प्रदीप कडबे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

चंद्रपूर :- दि 17 -10 -2026 रोजी या शारदा महिला मंडळ चंद्रपूर येथे शारदा देवी नवरात्र उत्सवानिमित्त आदरणीय डॉ.गायत्री अनिल कुमार रामटेके यांचा मी सावित्री बोलते का एकपात्री प्रयोग घेण्यात आला.

त्याप्रसंगी त्यांनी क्रांतीज्योती सावित्री माई यांचे जीवन चरित्र रेखाटले आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . लोकांपर्यंत महामानवांच्या विचारांचा वारसा घरा घरा पर्यंत पोहोचविण्याचे कार्य व त्या गेल्या कित्येक वर्षापासून करीत आहेत. उपस्थित सर्व प्रेक्षकांना त्यांनी भारताचे संविधानाचे पुस्तक आणि उद्देशिका देऊन संविधानाचे अनन्य साधारण महत्व पटवून दिले. संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्याप्रसंगी मा शारदा उत्सव मंडळाच्या सौ अलका खापणे,शोभा बद्दल, प्रतिभा रिठे,कुंदा उरकुडे, मीना खापणे यांची प्रमुख उपस्थीती होती.बहुसंख्येने प्रेक्षकांची उपस्थिती होती.

मंडळाच्या वतीने डॉ.गायत्री रामटेके यांचे कौतुक करून आभार मानले.

0 Response to "डॉ.गायत्री रामटेके यांनी माता शारदा उत्सवात केला. महामानवाच्या विचारांचा आणि संविधानाचा जागर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article