-->
प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांचा जाहीर सत्कार.

प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांचा जाहीर सत्कार.


 
नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी
          प्रदीप कडबे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

रामटेक/नागपूर :- धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला  " दैनिक बहुजन सौरभ राज्यस्तरीय काव्य अभिवादन सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर 2026 रोजी उत्कर्ष सभागृह,हिंदी मोर भवन, झासी राणी चौक सीताबर्डी  नागपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
.           सन्मानपत्र स्वीकारताना भीम शाहीर कडबे 

 या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी नागनाथ डोलारे मुंबई, कार्यक्रमाचे उद्घाटक  डॉक्टर सिद्धार्थ कांबळे प्रबंध संपादक बहुजन सौरभ, विशेष अतिथी  जेष्ठ साहित्यिक डॉ. अनिल सूर्या, प्रमुख अतिथी  ज्येष्ठ साहित्यिक इ.मो.नारनवरे, डॉ.विद्याधर बनसोड ज्येष्ठ साहित्यिक चंद्रपूर, प्राध्यापक संध्या राजुरकर बहुजन सौरभ, शालिक जिल्हे कर, डॉ.अजय चिकाटे, प्राध्यापक हृदय चक्रधर, प्राध्यापक डॉ.मनीष वानखेडे, वामन निल, प्रबोधनकार कवी गायक सुभाष मानवटकर, लैलेंद्र आंबुलकर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील  बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज, गायक प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांच्या सामाजिक कला पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 
यावेळी कवी एस आर शेंडे, सुरेश खोब्रागडे, अविनाश टिपले, संजय मोखडे, रमेश बुरबुरे, सफल श्रुती, कौशलचंद्र, प्राध्यापक चंद्रशेखर बांबोडे, प्राध्यापक ज्योतीक ढाले, डॉ. सुनंदा जुलमे, प्राचार्य धर्मरक्षित टेंभुर्ण, डॉ.महेंद्र कुमार मेश्राम, कलाम खान, डॉ.बळवंत भोयर भीमराव गणवीर, सरिता सातारडे, हितेश गोमासे, 
हेमलता ढवळे, मनोहर गजभिये, निलेश पाटील, अशोक गडकरी, राजेश डंभारे, संदीप गायकवाड, चित्तरंजन चौरे, प्रकाश दुलेवाले, प्रीती बाला बोरकर, सुषमा कळमकर, दीपक पंचभाई, नाना शेंडे, प्रतिभा सहारे, रोशनी गणवीर, लीलाधर गायकवाड, नागेश वाहुल वाघ, दिगंबर चनका पुरे, संगीता बनकर, संजय सायरे, प्रभू फुल झेले, मोनाली पोफरे, जोशना बनसोड, हरिदास मेश्राम, डॉ. प्रमोद नारायणे , भीम शाहिर/पत्रकार प्रदीप कडबे रामटेक, इ. प्रामुख्याने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रा. संध्या राजुरकर, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे, सूत्र संचालन प्रीती तिरपुडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष मानकर यांनी केले,तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कवी साहित्यिक उपस्थित होते.

0 Response to "प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप बागवान कडबे यांचा जाहीर सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article