डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारा - सभापती ढेंगे.
शनिवार, 17 अक्टूबर 2026
Comment
युगांतर बारसागडे
साप्ताहिक"जनता की आवाज"
साकोली/अर्जुनी मोर. :- मानव जातीच्या कल्याणासाठी न्याय समता बंधुता समाजात निर्माण व्हावी व सामाजिक एकोपा अबाधित व्हावा या ध्येयाने १४ ऑक्टोबर रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर बाबासाहेबांसह लाखो अनुयायी यांनी धम्म स्वीकारला.
संपूर्ण आयुष्यभर त्यांनी धम्म क्रांती घडवून आपले आयुष्य भारत मातेच्या सेवेत अर्पण करून भारतीय संविधान देऊन त्याच संविधानावर आपला भारत देश आज चालत असून बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मक क्रांतीतून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार आचार आपल्या आचरणात आणून जीवन जगणे हीच खरी धम्मक्रांती आहे.
असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे यांनी ईसापुर येथील सम्यक बौद्ध समितीच्या वतीने आयोजित सम्यक बौद्ध विहारात त्या कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी ईटखेडा ग्रामपंचायत च्या सरपंच आशा झिलपे, पोलीस पाटील सचिन लांजेवार, माजी सरपंच राजकन्या लांजेवार, शितल
येरणे माजी ग्रामपंचायत सदस्य नलिनी चांदेवार माजी उपसरपंच गजानन चांदेवार तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष रोकडे माजी ग्रामपंचायत सदस्य सुनिता गेडाम , आशा सेविका, प्रतिमा वकेकार, छाया बडवाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्धयांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा यांच्या हस्ते करण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले याप्रसंगी सरपंच आशा झिलपे तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष रोकडे माजी उपसरपंच गजानन चांदेवार नलिनी चांदेवार यांनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून सामाजिक एकोपा सलोखा अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून गावविकास साधण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे प्रतिपादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्नेहलताई गेडाम तर आभार प्रदर्शन प्रणाली ताई गेडाम यांनी केले.
0 Response to "डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारा - सभापती ढेंगे."
एक टिप्पणी भेजें