पीएम यशस्वी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत...!
शनिवार, 17 अक्टूबर 2026
Comment
• पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र तरतुदी...!
साप्ताहिक"जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क .
नागपूर/भंडारा :- इयत्ता नववी व दहावीतील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर अर्ज करावा.
उत्पन्नाची अट आणि पात्रतेनुसार मुलींच्या काही शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरायचे आहेत. इयत्ता पाचवी व आठवीतील मुलींचे अर्जही सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर सादर करावेत.
शाळा-महाविद्यालयांनी मार्गदर्शन करावे...!
शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी अर्जातील माहिती अचूक भरणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि संस्थास्तरीय पडताळणी वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शाळा व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांना संबंधित योजनांची माहिती देऊन अर्ज प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शिष्यवृत्तीविषयक अधिकृत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलला भेट द्यावी. अर्जाची अंतिम मुदत आणि पडताळणीचे वेळापत्रक अधिकृत पोर्टलवर तपासून विहित मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक उत्तर माध्यमिक शिष्यवृत्तीचे अर्ज NSP वर..!
ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग (SBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या पात्र ओबीसी मुलींसाठीच्या संबंधित मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे नवीन अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर सादर करावेत. या योजनांसाठी नवीन अर्ज करण्याची सुविधा महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांनी योग्य पोर्टलचा वापर करावा. दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती तसेच व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क परतावा यांसारख्या नमूद योजनांचे अर्ज पूर्वीप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर भरावेत.
सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पीएम यशस्वी (PM2 Y-S-SVI) पूर्व व उत्तर माध्यमिक शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर मागासवर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास घटक (EBC) तसेच विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी संबंधित योजनांच्या अटी तपासून अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यांनी केले आहे.
0 Response to "पीएम यशस्वी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत...!"
एक टिप्पणी भेजें