-->
द्र" गझल " 'काव्य फूले,

द्र" गझल " 'काव्य फूले,

झाले उगाच सारे होतेच व्हावयाचे,
जातो आम्ही सुखाने ऐसे
म्हणावयाचे...

आम्हास पाश नाही आम्ही
विमुक्त झालो, झाली
हे बोलता कशाला थोडे
रडावयाचे...


माहीत ना आम्हाला आम्ही
कुठून आलो,
तोडून सर्व धागे येथून
जावयाचे...

आम्हास पोचविण्या आली
कितीक प्रेते,
त्यांचे उगाच थोडे डोळे
टिपावयाचे...

ह्या वल्गना कशाला आम्हीच
स्वर्गवासी,
फिरुनी पुन्हा पशुचे कां जन्म
घ्यावयाचे ?...

                  प्रभाकर सोमकुवर
          ४/३७ ‌विश्वासनगर, नारा रोड,
                   नागपूर- ४४० ०१४
                 ( ९५९५ २५५  ९५२ )

0 Response to "द्र" गझल " 'काव्य फूले,"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article