-->
माविम मित्र मंडळ व पोलीस विभागाची संवाद बैठक.

माविम मित्र मंडळ व पोलीस विभागाची संवाद बैठक.


• महिला सुरक्षेसह विविध विषयांवर पोलीस अधिकारी व महिलांमध्ये संवाद.

        युगांतर बारसागडे 
साप्ताहिक "जनता की आवाज"

सडक अर्जुनी :- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), गोंदिया (महाराष्ट्र शासन अंगीकृत) अंतर्गत आधार लोकसंचालित साधन केंद्र, सडक अर्जुनी यांच्या वतीने महिला सुरक्षेच्या अनुषंगाने माविम मित्र मंडळ व पोलीस विभागाची संयुक्त संवाद बैठक तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथील सभागृहात ५ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महिला सुरक्षा, महिलांच्या समस्या, कायदेशीर बाबी तसेच महिलांनी अडचणीच्या प्रसंगी पोलिसांची मदत कशी घ्यावी, याबाबत उपस्थित महिलांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाला डुग्गीपार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुशील रामटेके, महेंद्र सोनवाने, जयश्री जांभुळकर, सडक अर्जुनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बिरला गणवीर, आधार लोकसंचालित साधन केंद्र सडक अर्जुनीच्या

तालुका व्यवस्थापक पालिंद्रा अंबादे, सचिव वैशाली डोये, उमेश उदापूरे यांच्यासह माविम मित्र मंडळाच्या महिला सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी समाजातील प्रत्येक घटकाने सजग राहण्याची गरज व्यक्त केली. महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला किंवा छळाला घाबरून न जाता आपल्या समस्या संबंधित यंत्रणेकडे मांडाव्यात. महिलांना कायद्याने दिलेल्या अधिकारांची माहिती असणे आवश्यक असून, पोलिस विभाग आणि महिला बचतगटांच्या माध्यमातून जनजागृती वाढविणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन वृंदावन कुंभरे यांनी केले. कार्यक्रमाला आधार लोकसंचालित साधन केंद्रातील सहयोगिनी सीआर पी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "माविम मित्र मंडळ व पोलीस विभागाची संवाद बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article