"व्ही एस एफ" चे अध्यक्ष बनले अनिल कापगते.
शुक्रवार, 2 अक्टूबर 2026
Comment
• नवेगावबांध येथे VSF युनिट समुहाचा स्नेह मिलन सोहळा संपन्न.
युगांतर बारसागडे
साप्ताहिक "जनता की आवाज"
साकोली :- साकोली सेंदूरवाफा शहरातील विविध उपक्रमांत अग्रगण्य ठरलेली एकमेव संघटना म्हणजे "व्ही एस एफ" युनिट समुह साकोली अंतर्गत व्हीआयपी ग्रुप साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन या तिन्ही समुहांना मिळून एक बलाढ्य संघटना म्हणून नावलौकिक झाले आहे.
या "व्ही एस एफ" चा स्नेह मिलन सोहळा ( शुक्रवार ०२ ऑक्टोंबर ) ला राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध येथे पार पडला. येथे सर्वानुमते या नंबर वन व्ही एस एफ संघटनेचे नवनियुक्त अध्यक्षपद हे अनिल कापगते यांना सर्वानुमते बहाल करण्यात आले.
व्ही. एस. एफ. युनिट समुह साकोलीचा सर्व सदस्यांनी नवेगावबांध येथे स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता. दरम्यान व्हीआयपी ग्रुप, साकोली मिडिया व फ्रिडम युथ फाऊंडेशन या तिन्ही मिळून एक "व्ही एस एफ" ची स्थापना व विविध कार्यक्रमांच्या पुढील शानदार आयोजनांसाठी रणनिती आखली गेली. येथे सर्व संमतीने या व्ही एस एफ चे अध्यक्ष अनिल कापगते यांची निवड करण्यात आली.
यावेळी सर्व सदस्यगण आशिष चेडगे, किशोर बावणे, अंकीत कापगते, डी. जी. रंगारी, रवि भोंगाणे, किशोर रंगारी, शिवशंकर शेंदरे, रणवीर कापगते, चंद्रशेखर कापगते, रूपेश कापगते, युगांतर बारसागडे, दिगंबर सुर्यवंशी, मनिष झिंगरे यांसह अर्णव गायकवाड नवेगावबांध, आरव चेडगे व पुरब कापगते यांनी तेथेच पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त व्ही. एस. एफ. चे अध्यक्ष अनिल कापगते यांचे हार्दिक अभिनंदन केले.
या स्नेह मिलन सोहळ्याला संचालन किशोर रंगारी यांनी केले तर आभार प्रदर्शन रणविर कापगते यांनी मानले.
0 Response to ""व्ही एस एफ" चे अध्यक्ष बनले अनिल कापगते."
एक टिप्पणी भेजें