-->
विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव येथील सारंग लुटे व अमन चवळे यांचे घवघवीत यश!..

विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव येथील सारंग लुटे व अमन चवळे यांचे घवघवीत यश!..

.            संजीव भांबोरे 
    साप्ताहिक "जनता की आवाज" 

भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालीम कुस्तीगीर संघ,जिल्हा भंडारा यांच्या सहकार्याने आयोजित सन २०२६-२७ च्या विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत भंडारा तालुक्यातील निमगाव येथील कु.सारंग बापूजी लुटे व अमन तुळशिदास (बालु) चवळे यांनी विजय संपादन करून उल्लेखनीय यश प्राप्त केले.

या स्पर्धेत सारंग बापूजी लुटे याने ४८ किलो वजनगटात, तर अमन तुळशिदास बाळू चवळे याने ५१ किलो वजनगटात प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळविला. दोन्ही खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कुस्ती कौशल्याच्या जोरावर नीमगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

त्यांच्या या यशामुळे नीमगाव (पहेला) परिसरात आनंदाचे वातावरण असून,गावकऱ्यांकडून व क्रीडाप्रेमींकडून दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

0 Response to "विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत निमगाव येथील सारंग लुटे व अमन चवळे यांचे घवघवीत यश!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article