-->
महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना नोंदणीकृत नसल्याची चर्चा.

महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना नोंदणीकृत नसल्याची चर्चा.

 • नवनिर्मित संघटनेच्या भुलथापांना बळी पडू नये.. या चर्चेला आले उधाण?

• जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कार्यक्रम भुलथापा देणारा?

• नवनिर्मित नर्सेस संघटनेचा राज्याध्यक्ष कॅडरविरहीत पुरुष कसा???.

          नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज"
 
भंडारा :- दि १३/१०/२०२६ :- गडचिरोली जिल्ह्यात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या शाखा सुरू झाल्या असून, अनेक वर्षांपासून काही संघटनेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांनी लुटमार करण्याचे धंदे सुरू केले आहेत.
त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक झटकेही तर कधी लचके  सारखे त्रास सहन करावे लागले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात नवनिर्मित संघटनेच्या स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष व सचिव असल्याचे सांगितले जात आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत  संघटनेचे प्रगतीपथावर असलेल्या विविध प्रकारच्या विकसित कामामुळे नवनिर्मित संघटनेच्या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांच्या पायाखालची  वाळू हळूहळू सरकल्याने त्यांनी दिनांक 15./ 10/26 ला गडचिरोली जिल्ह्यातील नर्सेस भगिनींना बुलथापा देऊन , जिल्ह्यातील नर्सेस भगिनीचे मनोबल खचविण्याकरिता व आपले वर्चस्व दाखविण्याकरिता  वीर बाबुराव शेडमाके  जिल्हा परिषद सभागृह येथे कार्यरत आयोजित करण्यात आलेला आहे.
 त्यात सेवानिवृत्त झालेल्या भगिनींचा सत्कार , पर्यवेक्षकांचा अमृत महोत्सव सोहळा, गुणवंत पाल्य गौरव सत्कार सोहळा,  सेवानिवृत्त आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यीका,  आरोग्य विस्तार अधिकारी यांचा निरोप समारंभ कार्यक्रम  ,  नवनियुक्त  आरोग्य सेविकांचा स्वागत सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे तसेच  ईतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

 शासन मान्यता प्राप्त नसलेल्या कर्मचारी संघटना कडून  प्राप्त झालेले निवेदने, पत्र व्यवहाराबाबत मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक दि. २४/९/२०२१ रोजी  महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केले आहे. या विषयांनुसार  सामान्य प्रशासन महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी शासन परिपत्रके निर्गमित करून मार्गदर्शन केले आहे.  त्यामुळे जिल्हा किंवा विभागात असलेल्या विविध कर्मचारी संघटना  तसेच अशा प्रकारे मनमानी करून तयार करण्यात आलेल्या संघटनांच्या पत्र व्यवहाराची दखल घेण्यात येऊ नये. 
 
अशा सूचना सामान्य प्रशासनाने दिलेल्या आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तवणुक ) नियम १९७९  मधील  नियम क्रमांक २९ अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांना  शासन मान्यता नसल्यास   संबंधित अधिकाऱ्यांनी  संघटनेने दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या निवेदनावर  विचार करू नये. याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह  विविध  विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांनी दक्ष असले पाहिजे. 

गडचिरोली जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी नवनिर्मित नर्सेस संघटनेच्या स्वयंघोषित  पदाधिकाऱ्यांनी  कार्यक्रमाला आमंत्रित - निमंत्रित करण्यात आलेल्या प्रमुख पाहुण्यांनाही भुलथापा  दिल्याची  चर्चा सुरू आहे. 
या कार्यक्रमाला  गडचिरोली जिल्हा परिषदेचे वादग्रस्त असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी  सुहास गाडे  यांच्यासह आरोग्य सेवेतील अनेक  अधिकारी भुलथापांना  बळी पडून आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत.
 
कार्यक्रम आयोजित करीत असलेली नवनिर्मित नर्सेस संघटनेचे रजिस्ट्रेशन नसल्याचे चर्चिले जात आहे.  नवनिर्मित संघटना ही शासन मान्यता प्राप्त नसून सुद्धा या संघटनेचे स्वयंघोषित पदाधिकारी  आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भुलथापा देत आहेत.
 प्राप्त झालेल्या गोपनीय  माहिती नुसार नवनिर्मित नर्सेस संघटनेचे

रजिस्ट्रेशन झाले नसून, शासनाची मान्यता नाही तरी संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई  करावी.  तसेच नवनिर्मित नर्सेस संघटनेने आमंत्रित केलेल्या निमंत्रण पत्रिकेत या स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांनी  नोंदणी क्रमांकाचा उल्लेख केलेला दिसत नाही .

0 Response to "महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना नोंदणीकृत नसल्याची चर्चा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article