महानगरपालिकेत “माजी राष्ट्रपती स्व.डॉआवाजपी.जे.अब्दुल कलाम” यांना अभिवादन.
शनिवार, 17 अक्टूबर 2026
Comment
विजय चौडेकर
साप्ताहिक "जनता की आवाज"
नांदेड :- भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि *भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम* यांच्या जयंतीनिमित्त दि.१५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांच्या प्रतिमेस महापौर सौ.कविता संतोष मुळे* व मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, "डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे केवळ भारताचे राष्ट्रपती किंवा एक महान शास्त्रज्ञ नव्हते, तर ते संपूर्ण जगासाठी आणि विशेषतः युवा पिढीसाठी एक आदर्श प्रेरणास्थान होते. भारताला जगातील महासत्ता बनवण्यासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीकोणातुन आपण सर्वांनी आपल्या कार्यातून योगदान देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त गंगाधर ईरलोड, उपायुक्त नितीन गाढवे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त सुरज नाईकवाडी, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मालमत्ता व्यवस्थापक पदमाकर कावळे यांच्यासह इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "महानगरपालिकेत “माजी राष्ट्रपती स्व.डॉआवाजपी.जे.अब्दुल कलाम” यांना अभिवादन."
एक टिप्पणी भेजें