-->
शिवछत्रपती सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

शिवछत्रपती सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा.

• ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मोफत आरोग्य शिबिर; १४० रुग्णांची तपासणी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

           नरेंद्र मेश्राम 
साप्ताहिक"जनता की आवाज"
  
भंडारा :- लाखनी तालुक्यातील शिवछत्रपती सामाजिक बहुउद्देशीय संस्था, दिघोरी/ना. यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर, दिघोरी/ना. यांच्या सहकार्याने बसस्थानकासमोरील पटांगणात मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. विविध आजारांची तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि शासकीय आरोग्य योजनांची माहिती व नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिरात मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन, दंत व मुखरोग तपासणी, सिकल सेल व क्षयरोग तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, माता व बाल आरोग्य तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आयुष्मान भारत कार्ड आणि आभा हेल्थ आयडी नोंदणीसाठी नागरिकांना मदत करण्यात आली.

शिबिरात १४० रुग्णांची तपासणी

शिबिरातील नोंदीनुसार, एकूण १४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये असंसर्गजन्य रोगांसाठी ११० आणि नेत्ररोगांसाठी ८० तपासण्यांची नोंद झाली. याशिवाय ३५ नागरिकांनी योग सत्रात सहभाग घेतला, २५ जणांची दंत तपासणी, २० जणांची हिमोग्लोबिन (Hb) तपासणी, आठ गर्भवती मातांची आरोग्य तपासणी, आठ जणांची मानसिक आरोग्य तपासणी आणि दोन जणांची सिकल सेल तपासणी करण्यात आली. तसेच एका व्यक्तीची कुष्ठरोगासाठी संशयित म्हणून तपासणी करण्यात आली.

मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. डी. बोरकर सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मेघश्याम हलमारे, डॉ. रूपाली पाखमोडे, सौ. संध्या कुळमते, कालीदास खोब्रागडे (जेष्ठ पत्रकार ) , श रद इटवले (सरपंच) आणि अजय खाब्रागडे (पोलीस पाटील) उपस्थित होते. समता फाउंडेशनचे टीम लीडर कैलाश मरकाम यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान

संस्थेचे अध्यक्ष आशिष खाब्रागडे, उपाध्यक्ष शेषराव हलमारे आणि सचिव पवन निरगुडे यांच्यासह अविनाश हलमारे, ब्रास्टिल खोब्रागडे, निशांत खोब्रागडे, संदीप इटवले आणि कु. वैष्णवी निरगुडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

आरोग्य पथकाचे मोलाचे सहकार्य

आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. रूपाली पाकमोडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वैष्णवी राठोड यांच्यासह कु. वंदना नेताम, कु. निरूपा इशकापे, कु. संगीता आकरे, कु. आशा उइके, सौ. सपना निरगुडे, कु. भुवनेश्वरी राघोर्ते, सौ. प्रभा कळपते, सौ. कुंदा मेश्राम आणि सौ. कुमुद टेकाम यांनी नागरिकांना आरोग्यसेवा दिली. आरोग्य सेवक (MPW) भूपेंद्र बोरकर तसेच संदीप सिंगणजुडे यांनीही आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शिबिराच्या कामकाजात योगदान दिले.

सामाजिक बांधिलकीतून आरोग्यसेवेचा संकल्प.

शिवछत्रपती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून आरोग्य जनजागृती करणे, गरजू नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि शासकीय आरोग्य योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वैद्यकीय पथक, आरोग्य सेविका, आशा सेविका, संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

0 Response to "शिवछत्रपती सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article