तुमसर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी.
रविवार, 4 अक्टूबर 2026
Comment
सुनील जयस्वाल
साप्ताहिक
"जनता की आवाज"
तुमसर/देवाडी :- आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी देवाडी जिल्हा परिषद परिसरात शेतकऱ्यांच्या धान पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. धान पिकावर आलेला मावा, तुडतुडा व इतर किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांच्या नुकसानीची परिस्थिती शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सध्या कमी पाऊस व किडींच्या प्रादुर्भावामुळे दुहेरी संकटाला सामोरे जात असल्याच्या बातम्याही अलीकडे प्रसिद्ध झाल्या आहेत.
यावेळी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेभाऊ कारेमोरे, पंचायत समिती सदस्य तथा तुमसर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज भाऊ झुरमुरे तसेच माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी परिसरातील लोकप्रतिनिधी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती लक्षात घेऊन तुमसर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विशेषतः धान पिकाचे झालेले नुकसान, किडींचा प्रादुर्भाव आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे मदत व शासकीय सवलती मिळाव्यात, अशी भूमिका शेतकरी व लोकप्रतिनिधींनी मांडली.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, लाखनी व साकोली तालुक्यांचा प्रत्यक्ष पीक नुकसानीच्या आधारे दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी अलीकडेही करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून त्यांचा प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा दौरा महत्त्वाचा ठरला. आता तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा आहे.
0 Response to "तुमसर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी."
एक टिप्पणी भेजें