किन्ही/मोखे.येथे 'हत्ती खोज' पर्यटन शाळा.
रविवार, 4 अक्टूबर 2026
Comment
उमेश बोरकर (जि.प्रती.)
सापताहीक "जनता की आवाज"
वृत्तप्रतिनिधी
भंडारा :- किन्ही / मोखे हे गाव महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील हा परिसर जंगलांनी आणि वन्यजीवांनी वेढलेला आहे जवळच कोका वन्यजीव अभयारण्य आणि नागझिरा अभयारण्य पसरलेले आहे.
जुन्या काळात मध्य प्रदेशातून येणारे रानटी हत्ती या जंगलात वास्तव्य करायचे किंवा पाण्याचे स्त्रोत शोधायचे या ऐतिहासिक संदर्भात या भागातील काही ठिकाणांना 'हत्ती खोज दगड' किंवा 'हत्ती खोज' परिसर असे नाव पडले आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या एका नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत काही निवडक जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक पर्यटन शाळा (एज्युकेशनल टुरिझम स्कूल) म्हणून विकसित केले आहे.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा किन्ही / मोखे त्या पैकी एक महत्त्वाची शाळा मानली जाते. या शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्येक्ष उपक्रम खेळ आणि निसर्गाच्या सानिध्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ ('आनंददायी शनिवार उपक्रम') जवळच असलेल्या अभयारण्यामुळे ही शाळा पर्यटकांना आणि इतर शाळेतील विद्यार्थ्यांना 'जंगल सफारी' जैवविविधता आणि पर्यावरण संदर्भाचे धडे देण्यासाठी एक उत्तम शैक्षणिक पर्यटन केंद्र म्हणून काम करते. साकोली परिसरातील पारंपारिक संस्कृती, झाडीपट्टी संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देण्याचे काम या पर्यटन शाळेच्या माध्यमातून केले जाते.
या पर्यटन शाळेला भेट देणारे लोक जवळच असलेल्या कोका वण्यजीव अभयारण्यातील ऐतिहासिक इंग्रज कालीन रस्ते 'हत्तीखोज दगड' सतीचा झरा आणि विविध तलावांचा आनंद घेऊ शकतात.
0 Response to "किन्ही/मोखे.येथे 'हत्ती खोज' पर्यटन शाळा."
एक टिप्पणी भेजें