महानगरपालिकेच्या वतीने “राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री" यांना अभिवादन.
शनिवार, 3 अक्टूबर 2026
Comment
विजय चौडेकर
साप्ताहिक
"जनता की आवाज"
माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती.
नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.०२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता *‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री”* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास *महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अभिवादन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी सांगितले की, "राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश नांदेड शहराला अधिक सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील. तसेच, माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी 'जय जवान, जय किसान' हा अजरामर नारा देऊन देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांचे साधे राहणीमान, प्रामाणिकपणा आणि उच्च विचार आपल्या सर्वांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरतील."
याप्रसंगी महापालिकेचे स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, माजी सभापती तथा नगरसेवक किशोर स्वामी, नगरसेवक सतीश देशमुख, अभिषेक सौदे, साहेबराव गायकवाड, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त गंगाधर ईरलोड, स.अजितपालसिंग संधु, नितीन गाढवे, मुख्य लेखापरीक्षक आनंद ऐनवाड यांच्यासह मनपाचे कर्मचारी व शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचा समारोप सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि नांदेड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली.
0 Response to "महानगरपालिकेच्या वतीने “राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री" यांना अभिवादन."
एक टिप्पणी भेजें