कौठा पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यास इच्छुक - संदिप नवघरे धानोरकर.
शनिवार, 3 अक्टूबर 2026
Comment
विजय चौडेकर
साप्ताहिक
'जनता की आवाज"
नादेंड :- कंधार लोहा विधानसभा मतदारसंघांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणुका ह्या रंगतदार होणार असे चित्र निर्माण झाले आहे या निवडणुकीमध्ये सर्वाधिक नव युवकांची उमेदवारी जास्त प्रमाणात होणार असल्याचे चित्र सध्यातरी बघावयास मिळत आहे संदीप नवघरे हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत ते धानोरा कौठा गावचे रहिवासी असून त्यांचा कौठा पंचायत समिती गणात या भागातील नागरिकांचा मोठा जनसंपर्क असून व कौठा पंचायत समिती गण अनुसूचित जाती पुरुष प्रवर्गासाठी सोडत झाला आहे संदीप नवघरे हे कौठा गणातील धानोरा कौठा गावातील कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या अडचणी या सगळ्यांचा त्यांनी जवळून अनुभव घेतला आहे हाच अनुभव आणि कवठा पंचायत समिती गणातील मतदार बंधू भगिनींचे पाठबळ व सहकार्य माझ्या पाठीशी घेऊन मी या पंचायत समिती सदस्याच्या निवडणुकीच्या रिंगणात
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यास मिळेल संधीचे सोने करेल असे मत संदीप नवघरे धानोरकर यांनी प्रसार माध्यमाची बोलताना व्यक्त केले ही निवडणूक माझ्या नव्या पर्वाची सुरुवात आहे मी ही निवडणूक सेवेच्या भावनेने लढणार आहे मला जर एकनाथ दादा पवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षांनी संधी दिल्यास आपल्या भागातील मतदार बंधू भगिनींच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात प्रत्येक मनात बदल घडवण्याची ताकद आपल्या एकतेत आहे माझ्या प्रत्येक पावलामागे तुमची साथ तुमचा आशीर्वाद आणि तुमचा विश्वास हीच माझी खरी ताकद असल्याचेही संदीप नवघरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले या प्रवासात माझ्यासोबत राहा मला मार्गदर्शन करा पाठबळ द्या तुमच्या हक्काच्या सर्वसामान्य कुटुंबातील कष्टकरी सन्माननीय कुटुंबातील माझ्यासारख्या नवतरुण युवकास आपल्या हक्काच्या माणसाला पंचायत समिती च्या सभागृहामध्ये पाठवा अशी आशा
संदीप नवघरे धानोरकर
यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली संदीप नवघरे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून मागील अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत सक्रिय सहभागी राहून समाजावरील अन्यायाविरूद्ध आवाज उठविला आहे बदलत्या गरजा आणि प्रलंबित विकास कामाची जाणीव ठेवून त्यांनी जनतेची सेवा हीच माझी प्राथमिकता असल्याचे दैनिक लोकमत तथा चालू वार्ता चे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना स्पष्ट सांगितले आहे संदीप नवघरे धानोरकर यांच्या बाजूने यश मिळवण्यासाठी तालुक्यातील चळवळीतील अनेक संघटनांनी तसेच विविध पक्ष व इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रमाणिकपणे पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे
0 Response to "कौठा पंचायत समिती गणातुन निवडणूक लढविण्यास इच्छुक - संदिप नवघरे धानोरकर."
एक टिप्पणी भेजें