-->
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ गावातील मशानभूमीचे इतर ग्रामपंचायतीने अनुकरण करावे- पत्रकार संजीव भांबोरे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ गावातील मशानभूमीचे इतर ग्रामपंचायतीने अनुकरण करावे- पत्रकार संजीव भांबोरे.


संजीव भांबोरे 
साप्ताहिक" जनता की आवाज"
  
भंडारा :- आज दिनांक 6 ऑक्टोबर 2026 ला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील 4000, हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या मशानभूमीला भेट दिली असता त्या ठिकाणी फुल झाडाची लागवड केलेली आढळून आले.

याच मशानभूमीत बसण्याकरिता आसनाची व्यवस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात केलेली आहे .लोकांना बसण्याकरिता वैकुंठ धाम सुद्धा बांधण्यात आलेले आहे. प्रेत जाण्याकरिता सुद्धा सुशोभित असे मशान शेड उभारण्यात आलेले आहे.रात्री बे रात्री प्रेत यात्रा मशानभूमीत आली तर त्या ठिकाणी सौर ऊर्जा लाईटची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे.

संपूर्ण परिसर स्टाईल लावून सुशोभित करण्यात आलेली आहे.सर्व जाती-धर्माचे लोक एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार करीत असतात.गावात ज्या पद्धतीची सुधारणा केली नसेल अशा प्रकारची सुव्यवस्था ग्रामपंचायत ने स्मशानभूमीत केलेली आहे. त्या ग्रामपंचायतचे करावे तितके कौतुक कमी आहे. 

सदर ग्रामपंचायतचे अनुकरण इतर ग्रामपंचायतीने करून अशा प्रकारची सुधारणा आपल्या गावात करावी असे आवाहन सुद्धा पत्रकार संजीव भांबोरे यांनी केलेले आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम उपस्थित होते.

0 Response to "भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ गावातील मशानभूमीचे इतर ग्रामपंचायतीने अनुकरण करावे- पत्रकार संजीव भांबोरे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article