कमिशनच्या विळख्यात ग्रामविकास ग्रामस्थांचा आरोप ? सरपंचपदाच्या प्रतिमेलाच धक्का..
मंगलवार, 6 अक्टूबर 2026
Comment
साप्ताहिक
आवाज की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/तुमसर :- गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ग्रामपंचायतींची व्यवस्था उभी केली. गावातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर आहे. मात्र, विकासकामांच्या आडून कमिशनखोरीचे आरोप आणि लाभार्थ्यांकडून 'सेटिंग'ची मागणी होत असल्याच्या चर्चांनी ग्रामविकास व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. परिणामी, विकासाचा पैसा नेमका गावाच्या विकासासाठी खर्च होतोय की मध्यस्थांच्या खिशात जातोय, असा सवाल ग्रामीण भागातून उपस्थित होत आहे.
ग्रामपंचायतीचा सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक. गावाच्या विकासाची दिशा ठरविण्याची आणि प्रशासनाला जबाबदार धरण्याची मोठी जबाबदारी या पदावर असते. मात्र, विविध विकासकामांमध्ये कमिशन घेतल्याच्या चर्चामुळे काही ठिकाणी 'सरपंच म्हणजे विकासाचा शिल्पकार' या प्रतिमेऐवजी 'मलिदा मिळविणारे पद' अशी चुकीची धारणा निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
गावातील रस्ते बांधणे व दुरुस्ती, नाल्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, दिवाबत्ती, सांडपाण्याची विल्हेवाट, जन्म-मृत्यू.
• ग्रामविकासाला पारदर्शकतेची गरज..
ग्रामपंचायत ही ग्रामीण लोकशाहीची पहिली पायरी आहे. त्यामुळे या व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अबाधित राहणे अत्यावश्यक आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकता, निधीच्या वापराची सार्वजनिक माहिती, कामांची गुणवत्ता आणि लाभार्थी निवडीत निष्पक्षता यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. कमिशनखोरीच्या चर्चेने ग्रामविकासाची विश्वासार्हता डागाळत असेल, तर त्याचा सर्वाधिक फटका सामान्य ग्रामस्थांनाच बसतो. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने केवळ कागदी नियंत्रण न ठेवता प्रत्यक्ष गावपातळीवर कठोर देखरेख आणि उत्तरदायित्वाची व्यवस्था उभी करण्याची गरज आहे.
"विकासासाठी आलेला पैसा गावाच्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे. एखाद्या कामासाठी कमिशन किंवा इतर आर्थिक व्यवहारांची मागणी ागणी होत असल्याच्या तक्रारी असतील, तर त्याची प्रशासनाने स्वतंत्र चौकशी करावी."
मंगेश वंजारी,
सामाजिक कार्यकर्ता.
८८ सरपंच हे गावाचे प्रथम नागरिक असतात; त्यामुळे या पदाकडे आदराने पाहिले जाते. मात्र विकासकामांमध्ये गैरव्यवहाराच्या तक्रारी वारंवार ऐकायला मिळत असतील, तर प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. प्रत्येक विकासकामाचा खर्च, मंजूर निधी, कामाची गुणवत्ता आणि लाभार्थ्यांची माहिती ग्रामस्थांसमोर सार्वजनिक झाली पाहिजे.
विवाह नोंदणी, शिक्षण व आरोग्य सुविधा, शेती व पशुधन विकासाच्या योजना, तसेच बाजार, जत्रा व उत्सवांची व्यवस्था ही ग्रामपंचायतीची महत्त्वाची कामे आहेत. याशिवाय ग्रामपंचायतीच्या हद्दीतून वसूल होणारे कर आणि शासनाकडून मिळणाऱ्या
ग्रामस्थ, आमगाव.
निधीचा योग्य व पारदर्शक वापर करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवर आहे. मात्र, या जबाबदाऱ्यांपेक्षा विकासकामांतील आर्थिक व्यवहारांना अधिक महत्त्व मिळत असल्याची तक्रार काही गावांतून पुढे येत आहे.
0 Response to "कमिशनच्या विळख्यात ग्रामविकास ग्रामस्थांचा आरोप ? सरपंचपदाच्या प्रतिमेलाच धक्का.."
एक टिप्पणी भेजें