सामाजिक कार्यकर्ता अनिल वासनिक यांच्यावरील ‘कार्य वृत्तनामा’ पुस्तकाचे प्रकाशन.
गुरुवार, 15 अक्टूबर 2026
Comment
नागपूर विभागीय विशेष प्रतिनिधी
प्रदीप कडबे रामटेक
साप्ताहिक "जनता की आवाज"
नागपुर : दि. 14 आक्टोंबर 2026 सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार अनिल वासनिक यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून अव्याहत चालविलेल्या कार्याचा संक्षिप्त लेखा -जोखा असलेल्या ‘कार्य वृत्तनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज, बुधवार 14 आक्टोंबर 2026 रोजी सीताबर्डी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनच्या मोर भवनातील सभागृहात भदंत नाग दीपांकर थेरो यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
वृत्तनामा पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी
भदंत नाग दीपांकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास ज्येष्ठ नेते डी. एम.बेलेकर, डा. मुकुंद मेश्राम, प्रा. प्रवीण कांबळे, डा. दिलीप तांबटकर, युवराज फुलझेले, राजकुमार वंजारी हे अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम अपघाती निधन झालेले ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक मिलिंद कीर्ती यांना सामूहिक श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी ज्येष्ठ नेते डी. एम.बेलेकर, डा. मुकुंद मेश्राम, प्रा. प्रवीण कांबळे, डा. दिलीप तांबटकर, युवराज फुलझेले यांनी आपल्या भाषणातून अनिल वासनिक यांनी विद्यार्थी दशेपासून चालविलेल्या समाज सेवेच्या विविध पैलूंचा आढावा आपल्या भाषणातून घेतला . तर अनिल वासनिक यांनी आपल्या कार्याची प्रेरणा डा. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असल्याचे सांगितले.
अनिल वासनिक यांच्या सारख्या निस्वार्थ व संघर्षशील कार्यकर्त्यांमुळेच सामाजिक चळवळीत जीवंतपणा आणि चैतन्य आहे, त्यांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे असल्याचे मत भदंत नाग दीपांकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन राजकुमार वंजारी यांनी केले. प्रास्ताविक कवी सुरेश वंजारी यांनी केले, तर आभार धर्मपाल वंजारी यांनी मानले. या वेळी रमाई दिनदर्शिका – 2027 चे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास नरेश मेश्राम, दिलीप तांदळे, दिलेश मेश्राम, राजन टेंभुर्णे, दिगांबर चनकापुरे, विजय रामटेके, राजेंद्र कांबळे, आशा ढोके, कविराज बोरकर, शैलेंद्र वासनिक, रामभाऊ बागडे, तुलाराम मेश्राम, विश्वनाथ बांबोलकर, जासुंद पाटील, प्रकाश मोटघरे, अश्विन पिल्लेवान, दिलीप ढोके, गुलाब नंदेश्वर, हरिदास बेलेकर, अनिल बाराहाते, पृथ्वी भगत, अरूण कांबळे, प्रवीण जांभुळकर, विनोद मंडपे, ज्ञानदेव गजभिये यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो कॅप्शन – कार्य वृत्तनामा पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी राजकुमार वंजारी, धर्मपाल वंजारी, प्रवीण कांबळे,सुरेश वंजारी, अनिल वासनिक, युवराज फुलझेले, भदंत नाग दीपांकर थेरो, डी. एम. बेलेकर, डा. दिलीप तांबटकर, डा. मुकुंद मेश्राम,इत्यादी उपस्थित होते.
0 Response to "सामाजिक कार्यकर्ता अनिल वासनिक यांच्यावरील ‘कार्य वृत्तनामा’ पुस्तकाचे प्रकाशन."
एक टिप्पणी भेजें