-->
'धम्मचक्र प्रवर्तन दिनी' पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व उद्घाटन सोहळा थाटात साजरा.

'धम्मचक्र प्रवर्तन दिनी' पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व उद्घाटन सोहळा थाटात साजरा.



         उमेश बोरकर जि.प्र. 
साप्ताहिक"जनता की आवाज"
  
 भंडारा :- धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी आणि बंधू भावाचा आदर्श जपत सातलवडा येथे दिनांक 14 ऑक्टोंबर 2026 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्याला को अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.
.          उदघाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते 

 दरवर्षी 'धम्मचक्र प्रवर्तन' म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता जातीभेद आणि विषमतेचा त्याग करून समता प्रज्ञा करुणा आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित बौद्ध धम्माचा स्वीकार केला. भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पूज्य श्रामणेर अश्वजित भन्ते यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता करण्यात आले.

 तसेच सायंकाळी चार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णा कृती पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. आणि रात्री नऊ वाजता लहान मुला मुलींचे रेकॉर्डिंग डान्स, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, महामानवाच्या जीवनावर भाषण स्पर्धा असे अनेक प्रकारचे सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रम घेण्यात आले. 

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय होमराज भाऊ कापगते संचालक बीडीसीसी भंडारा, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मदन भाऊ रामटेक माजी समाज कल्याण सभापती, दीपप्रज्वलक डॉक्टर नेपाल भाऊ रंगारी माजी जि.प. सदस्य, सुशिल भाऊ गणवीर पंचायत समिती सदस्य, अजय भाऊ उके सामाजिक कार्यकर्ता, शितलताई राऊत समाज कल्याण सभापती, अंजनाताई मेश्राम सरपंचा, अनिल टेंभरे सामाजिक कार्यकर्ता, पुरुषोत्तम रामटेके श्रीराम नगर,

 राजेंद्र जी रामटेके पीएचसी गोरेगाव, प्रेमलाल जी. बोरकर सर जुन्नर पुणे, प्रवीण गजभिये कॉन्ट्रॅक्टर चंद्रपूर, जुनेश रंगारी कॉन्ट्रॅक्टर नागपूर, देवानंद नागदेवी माजी नगरसेवक लाखांदूर, नंदलालजी गणवीर सर साकोली, आशिष जी रामटेके डायरेक्टर नागपूर, उपराज बोपचे उपसरपंच, शैलेश गजभिये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, राजेशजी रामटेके माजी सरपंच, सोनुभाऊ कटरे, साखरे सर मुख्याध्यापक ना.वी., सुजितज मेश्राम शाळा सुधार समिती अध्यक्ष, 

निखिल मेश्राम ग्राम पंचायत सदस्य, मायाताई भोंडे ग्रामपंचायत सदस्य,मनिशा ताई सोनवणे ग्रामपंचायत सदस्य, गीता ताई गजभिये ग्रामपंचायत सदस्य व इतरही मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुणाल बोरकशुभम मेश्राम किरण बेदी, नितेश ईलमकार, साहिल रामटेके, नागबोधि गजभिये, सागर गजभिये,दिशांत बोरकर, सम्यक गणवीर, अक्षय मेश्राम, कौशिक वंजारी, सोनल ईलकार, हिमांशू रामटेके, सुजाता रंगारी, प्रणय खांडेकर यांचे मोलाचे सहकार्य झाले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वंजारी माजी त. मु.सअध्यक्ष यांनी केले तर मान्यवरांचे आभार पत्रकार उमेश बोरकर यांनी मानले. शेवटी कार्यक्रमाची सांगता महामानवाच्या जयघोषाने करण्यात आली.

0 Response to "'धम्मचक्र प्रवर्तन दिनी' पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण व उद्घाटन सोहळा थाटात साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article