-->
प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र -नागपूर व .नागनाथ डोलारे -पनवेल आयोजित.

प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र -नागपूर व .नागनाथ डोलारे -पनवेल आयोजित.



• १५वे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन पनवेल -२०२६ अतिशय उत्साहात संपन्न संपन्न.

 नागपूर विभाग विशेष प्रतिनिधी 
 प्रदीप कडबे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

रामटेक :- पनवेल : दिनांक २५/१०/२०२६ रोजी नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ सभागृहात सकाळी ९.००ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत डॉ.राज यावलीकर,अमरावती, राजेंद्र फंड अहिल्यानगर, कविसंमेलनाध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात गझल मुशायरे,पुरस्कार वितरणात महाराष्ट्राच्याज्ञकानाकोपऱ्यातून अनेक कवींनी, गझलकारानी व पुरस्कार्थीनी भाग घेतला होता.

 या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ. रा.गो. चवरे ,पुणे होते. स्वागताध्यक्ष किशोर कुमार मिश्रा, शेगाव होते.गझल मुशायराध्यक्ष स्नेहा सुभेदार पुणे, डॉ. राजेंद्र केंगार ,अकलूज हे लाभले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत पाटील विरार व प्रमुख अतिथी म्हणून पनवेलचे पुंडलीक म्हात्रे ,उरण हे लाभले होते. गजल मुशायरामध्ये महाराष्ट्रातील नामवंत गझलकार डॉ. सुभाष कटकदौंड खोपोली, डॉ. राजेंद्र केंगार, किशोर मिश्रा शेगाव, गझलकारा स्नेहा सुभेदार पुणे, दिपाली घाडगे पनवेल व अशा अनेक गझलकारानी शेर ,मुशायरे व गझल सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.

तर काव्य संमेलनात नामवंत कवींनी आपल्या उत्कृष्ट दर्जेदार कविता सादर केल्या त्यात नाशिकचे अतुल पाटणे टिटवाळ्या चे एन.ए.कदम कवयित्री माधवी मोटलिंग नवी मुंबई, वर्षा साठे शिंत्रे, पौर्णिमा देसाई, प्रांजली चौधरी गोवा नागोराव सोनकुसरे नागपूर, बाबा ठाकूर पुणे, बाळासाहेब देसाई अहिल्यानगर यांनी आपल्या उत्कृष्ट कविता सादर करून सर्वांची मने जिंकली.

     पनवेलचे ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ डोलारे,प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक लीना देगलूरकर नागपूर यांनी संमेलनाचे अतिशय उत्कृष्ट आयोजन केले होते. दूरवरून आलेल्या सर्व साहित्यिकांची चहा नाश्ता भोजन व राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती.त्यामुळे सर्व साहित्यिकाने आयोज कांचे तोंड भरून कौतुक केले.मुंबईचे अजित उबाळे,प्रफुल कुलकर्णी,कर्नल शरद पाटील पुणे यांनी कवी संमेलनाचे,गझल मुशायराचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

हे साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी मुंबईचे अजित उबाळे, दीपक करंगुटकर, समीर परब व गणपत तरंगे यांनी मोलाचे सहकार्य केले. कवी साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र -नागपूर व .नागनाथ डोलारे -पनवेल आयोजित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article