इंडिकेम ची खते शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनीच, वाढवते शेतीच्या उत्पन्नासह गुणवत्ता.
सोमवार, 16 नवंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- आज बाजारामध्ये असंख्य कृषी विषयक कंपन्या स्वतःचे उत्पादने शेतकऱ्यांसाठी सेवा देत आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून शेती क्षेत्रामध्ये मोठा बदल झाला असून तो बदल माती, वातावरण आणि किडींचा प्रादुर्भाव यामध्ये दिसुन आला आहे. साहजिकच याचा फटका पिकांच्या उत्पादनांवर दिसून येतो. त्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्पादने वापरतात परंतू त्यांना समाधानकारक फरक पिकांवरती दिसून येत नाही. मुख्यता सर्वात जास्त बनावटपणा हा विद्राव्य खतातून होतो.
निकृष्ट दर्जाच्या खतांचा सुळसुळाट मोठा प्रमाणात झाला आहे. यामध्ये अनेक कंपन्यांकडे सोडियमयुक्त खते आहे याचा मातीसह, सूक्ष्मजीव आणि पिकालाही याचा मोठा त्रास होतो. आणि त्यातच शेतकऱ्याचा घात होतो परंतु त्यातच एक कंपनी शेतकऱ्यांसाठी खरोखरच वरदान ठरली आहे, तीचे नाव म्हणजे इंडिकेम स्पेशाल्टी फर्टीलायझर्स प्रा. लि. पुणे या कंपनीने अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या थेट पिकांवर समाधानकारक फरक दाखवून शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वासाचे घर निर्माण केले आहे. या कंपनीचा थोडक्यात परिचय म्हणजे इंडिकेम स्पेशाल्टी फर्टीलायझर्स प्रा. लिमिटेड ही कंपनी गेल्या 12 वर्षांपासून काम भारतभर करत आहे.
सोबतच कंपनीकडे प्रत्येक उत्पादन विशेष आणि गुणवत्तापूर्ण आहे त्याचे कारण म्हणजे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यामध्ये पॉलीफॉस्फेट, अँटिकॅल्क, ऑक्साईड या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतात उत्पादने वापरल्यानंतर जलद गती त्याचा थेट आणि दीर्घकाळ परिणाम हा पिकांवरती दिसून येतो. त्यामुळे वापरकर्ता शेतकरी हा वर्षानुवर्ष फक्त याच कंपनीचे उत्पादने आपल्या शेतात वापरतो याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादनांचा उत्कृष्ट परिणाम. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीने शेतीसाठी उपयुक्त असे 15 पेक्षा जास्त वेगवेगळे फायदेशीर उत्पादने बाजारामध्ये आणले आहेत.
संचालकांची शेतीच्या अन् मातीच्या अडचणी वर मात
अनेक व्यवसायांपैकी शेती हा व्यवसाय न परवडणारा आहे असा सूर अनेक क्षेत्रातून निघतो. परंतु या सुराला फाटा देत कंपनीच्या संचालकांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी कंपनी उभी केली अर्थात ती खूप अभ्यासपूर्वक. आज जेवढे काही प्रॉब्लेम शेतीचे आहेत त्यातील साठ टक्के अडचणी या मातीमुळे आहेत आणि मातीवर काम करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे त्यांनी ठरवले आणि कुठल्याही जमिनीच्या कुठल्याही अडचणी असतील त्यामध्ये खारपड जमीन, चुनखडीयुक्त जमीन, आम्लयुक्त जमीन, चोपण जमीन, भारी जमीन , कमी व जास्त पीएच, या सर्व जमिनी वर इंडिकेम (Indichem Specialty Fertilizers) कंपनीची खते विशेषतः अडचणीच्या जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवणे, पोषण व्यवस्थापन सुधारणे आणि पिकांवरील ताण कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतात. _या कंपनीने यशाच्या शिखर चढताना मोठा वाटा हा कंपनीचे संचालक श्री किशोर गायकवाड आणि श्री अमित कुवर, मार्केटिंग हेड श्री रितेश पाटील यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट हेड विक्रांत तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली_ काम करणारा समूह सुद्धा मोठ्या जोमाने आणि शेतकऱ्यां-प्रती प्रेम, आदर ठेवून स्वतःबरोबरच शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.
त्याचबरोबर विभागनिहाय कार्यरत असणारी अधिकारी मंडळी यांच्या मेहनतीमुळे सुद्धा कंपनीचे उत्पादने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत आहेत.
कंपनीची आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाशी जोडणी
संगत ही खूप महत्त्वाची असते यावरच आपले यश आणि गुणवत्ता ठरलेली असते त्याच पद्धतीने या कंपनीची संगत आणि कंपनीच्या प्रवासातील महत्त्वाचा पैलू म्हणजे बेल्जियममधील Prayon या कंपनीसोबत व्यावसायिक संबंध आहेत. Prayon ही कंपनी संपूर्ण जगामध्ये 70% पर्यंत फॉस्फरस पुरवते.
इंडिकेम याच कंपनीच्या खतांचा मोठ्या प्रमाणात शेतावरती रिझल्ट का येतो याचे अनेक अनुभव शेतकऱ्यांसमवेत याची देही याची डोळा मी वेळोवेळी व्हिडिओ आणि यशोगाथा प्रकाशित केलेल्या आहेत.
10 लक्षांहून अधिक शेतकऱ्यांचा विश्वास कमावत, ........ पेक्षा जास्त अधिकृत विक्रेते आहेत.
इंडिकेम ची सर्व उत्पादने सरकारी नियमांनुसार नोंदणीकृत आहेत म्हणजेच खतांशी संबंधित अधिकृत मान्यता आणि अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन उत्पादनांची मान्यता म्हणजेच ही उत्पादने कायदेशीर, तपासलेली आणि सुरक्षित वापरासाठी मान्यताप्राप्त आहेत.
इंडिकेम ही कंपनी जागतिक अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी मातीचे आरोग्य सुधारवण्यासाठी प्रयत्नशील असून संबंधित आव्हाने सोडवण्यासाठी अगदी अतोनातून प्रयत्न करत आहे. याच कंपनीकडून शेतकऱ्यांना मातीचे पुनरुत्पादन करण्यास, मातीचा कस आणि मातीतील जिवाणूंची संख्या टिकवत पिकांची उत्पादकता वाढविण्यात आणि अंतिम ग्राहकांच्या टेबलवर सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक अन्न आणण्यास मदत करते.
विशेष बाब म्हणजे या कंपनीचे उत्पादने शेतकऱ्यांनी वापरले तर नक्कीच शेतकऱ्याच्या शेतामध्ये उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नामध्ये भर झालेली सहजपणे दिसून येते. ही कंपनी विशेषतः शाश्वत शेतीसाठी कृषी निविष्ठांचे उत्पादन आणि पुरवठ्यासाठी नेहमीच आघाडीवर आहे.
उत्पादनांचा पिकांवरती जलद आणि उत्कृष्ठ परिणाम...
आपल्या उत्पादनांचा पिकांवरती जलद आणि उत्कृष्ठ परिणाम दाखवणारी कृषी उत्पादने शेतकऱ्यांना पुरवणारी कंपनी म्हणून इंडिकेम ची एक मोठी ओळख शेतकऱ्यांसमोर आणि व्यापाऱ्यांसमोर बनली आहे. ही कंपनी भारतातील जवळपास सर्वच पिकांवर काम करते.
आज जेव्हा शेतकरी आपल्या पिकांच्या पोषणासाठी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करतो तेव्हा हीच कंपनी खर्च केलेला एक ना एक रुपयाचा फायदाच करून देते. हे वापरकर्त्या शेतकऱ्यांनी ओळखले आहे.
लेखन :- गोपाल उगले पाटील
0 Response to "इंडिकेम ची खते शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनीच, वाढवते शेतीच्या उत्पन्नासह गुणवत्ता."
एक टिप्पणी भेजें