पुरोगामी चळवळ गतीमान करणे आवश्यक-सुरेश डांगे
सोमवार, 16 नवंबर 2026
Comment
• दै. पुरोगामी लढा वृत्तपत्राचा लोकर्पण सोहळा.
संजीव भांबोरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
चिमूर :- देशात सर्वत्र अशांततेचे व अविश्वासाचे वातावरण सुरू असून माणूस एकमेकांपासून दुरावत चालला आहे. सत्ताधारी व विरोधक "अराजकता" या शब्दाचा आपल्या सोयीनुसार अर्थ काढून संभ्रम निर्माण करीत असतांना दै. पुरोगामी लढा या वैचारिक वृत्तपत्राचा जन्म होणे याचाच अर्थ पुरोगामी विचाराची आज ख-या अर्थाने गरज निर्माण झाली आहे.
चिमूर परिसरात पुरोगामी विचारांचा वारसा स्वातंत्र्यपूर्व काळापासून असून स्मृतीशेष भाई रहिमतुल्ला यांनी हि चळवळ गतीमान केली होती. दरम्यानचे काळात चळवळीचा वेग कमी झाल्याचे चित्र प्रस्तापितांकडून रंगविण्यात आले होते, मात्र आता युवक जागा झाला आहे.आजच्या परिस्थितीत पुन्हा चळवळ लोकांपर्यंत पोहचविण्याची गरज निर्माण झाल्याचे प्रतिपादन पुरोगामी न्युज नेटवर्क (समुह) चे संचालक तथा साप्ताहीक पुरोगामी संदेशचे मुख्य संपादक सुरेश डांगे यांनी केले.
चिमूर येथील शेतकरी भवन येथे आयोजीत "दैनिक पुरोगामी लढा" च्या प्रथम अंक लोकार्पण समारंभात मार्गदर्शन करतांना सुरेश डांगे बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी साप्ताहीक "लोक प्रतिष्ठाचे" संपादक राम चिचपाले होते. तर विचार मंचावर चिमूर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अश्वीन अगडे, जेष्ठ काँग्रेस नेते जुनेद खान, दैनिक पुरोगामी लढाचे संपादक ज्ञानेश्वर जुमनाके, सामाजिक कार्यकर्ते हितेश मडावी, जनार्धन गेडाम, किष्णा गोंगले, महेश मोहुर्ले, व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हा अध्यक्ष (पूर्व विभाग) श्रीहरी सातपूते, चिमूर तालुका प्रेस असोशिएशनचे सचिव कलीम शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
"दै. पुरोगामी लढा" हे वृत्तपत्र सुरू होणे ही ऐतीहासिक नोंद असून या प्रसंगाचा साक्षदार होण्याचे सौभाग्य आपल्याला लाभले आहे. या वृत्तपत्राने सामान्य नागरीकांच्या प्रश्नांना ऐरणीवर आणून शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करावे अशी अपेक्षा जुनेद खान यांनी व्यक्त केली तर राम चिचपाले यांनी आपल्या प्रदिर्घ पत्रकारीता काळातील अनुभव विशद केले. याप्रसंगी किष्णा गोंगले, महेश मोहुर्ले यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यकमाचे प्रास्ताविक हितेश मडावी, संचालन इमरान कुरेशी यांनी केले. उपस्थितांचे आभार संपादक ज्ञानेश्वर जुमनाके यांनी मानले. दरम्यान जि.प. चंद्रपूरचे माजी अध्यक्ष डॉ. सतिश वारजूकर व गडचिरोली जिल्हा कॉग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी कार्यकमाला सदिच्छा भेट दिली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पुरोगामी परिवारातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 Response to "पुरोगामी चळवळ गतीमान करणे आवश्यक-सुरेश डांगे"
एक टिप्पणी भेजें