पोलीस स्टेशन तुमसर डी. बी. पथकाची कौतुकास्पद कामगीरी.
बुधवार, 25 नवंबर 2026
Comment
• वृध्द महीलेला नविन बसस्टॉप तुमसर येथून सुनसान ठिकाणी नेवून जबरी चोरी करणारा इसम गजाआड '
• श्री. नूरुल हसन, पोलीस अधिक्षक भंडारा, श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक भंडारा, श्री. महेश पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही.
साप्ताहिक "जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
भंडारा/तुमसर :- दिनांक 17/11/2026 चे 04.30 वाजता ते 18.00 वाजता दरम्यान यातील जखमी फिर्यादी नामे सौ. इंदीरा कमलदास तिजारे, वय 60 वर्ष, रा. नांदगांव, ता. मौदा, जिल्हा नागपुर,
ही कर्कापुर येथे मुलीच्या गावी जाण्याकरीता तुमसर बसस्टॉप वर बसची वाट पाहत असतांना एक अनोळखी इसमाने फिर्यादीला कर्कापुर येथे सोडुन देतो असे बोलुन त्याचे मोटार सायकल वर बसवुन येरली, झारली, मार्गे मोहगाव खदान शिवारातील नहरावर नेवुन धमकी देवुन फिर्यादीचे कानातील 1) सोन्याचे कुड्या वजन 2.5 ग्रॅम कि. 27,500/- रु.2) गळ्यातील एक लहाण मंगळसुर ज्यात एक डोरला वजन 1.5 ग्रॅम कि. 15,000/- रु 3) गळयातील 80 लहाण मनी वजन 1.5 ग्रॅम कि. 17,500/- रु व डोरला वजन 1.5 ग्रॅम चा मंगळसुत्र कि. 20,000/- रु असा एकुन 7 ग्रॅम वजन कि. 80,000/- रु चा माल हिसकावुन नेल्याने फिर्यादीचे डाव्या कानाला जखम झाल्याने फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरुन व वैद्यकीय तपासनी अहवालावरुन,
गुन्हयाचे स्वरुप
पो.स्टे. तुमसर येथे अपराध क्रमांक 1136/2026 कलम 309(4),115(2),351 (2) भारतीय न्याय संहीता 2023 अन्वये गुन्हा नोंद असुन तपासात आहे.
सदरची कारवाई - श्री. नूरुल हसन, पोलीस अधिक्षक भंडारा, श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक भंडारा, श्री. महेश पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक विजय कशोधन, क्राईप पो. नि. बाळासाहेब अघाव, पोलीस ठाणे, तुमसर यांचे नेतृत्वाखालील डी. बी. इंचार्ज पो.उप.नि. प्रविण सयात, सोबत डि.बी. पथकातील पो.शि. नामदेव बळदे, राजु गिरीपुंजे, विजय दमाहे यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचा सि.सि.टी.व्ही फुटेज व गोपनिय बातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहीती वरुन आरोपी नामे गजानन रामचंद्र हटवार वय 42 वर्ष रा. चोखाळा ता. रामटेक, जि. नागपुर यास ताब्यात घेवुन सखोल विचारपुस केली व त्याच्याकडुन गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल खालील प्रमाणे जप्त केले आहे.
पो.स्टे. तुमसर अपराध क्रमांक 1136/2026 कलम 309 (4), 115(2), 351(2) भा. न्या.सं. 2023 आरोपी :- गजानन रामचंद्र हटवार वय 42 वर्ष रा. चोखाळा ता. रामटेक, जि. नागपुर
सोन्याचे दागीने वर्णन
गुन्हयातील चोरी गेलेला संपुर्ण मुद्देमाल 7 ग्रॅम अं.कि.80,000/- रु चा माल हस्तगत करण्यात आला आहे
सदरची कारवाई श्री. नूरुल हसन, पोलीस अधिक्षक भंडारा, श्री. निलेश मोरे, अपर पोलीस अधिक्षक भंडारा, श्री. महेश पाटील, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय कशोधन, क्राईप पो.नि. बाळासाहेब अघाव, पोलीस ठाणे, तुमसर पोलीस ठाणे, तुमसर यांचे नेतृत्वाखालील डी. बी. इंचार्ज पो.उप.नि. प्रविण सयात, सोबत डि.बी. पथकातील पो.शि. नामदेव बळदे, राजु गिरीपुंजे, विजय दमाहे पोलीस ठाणे तुमसर यांनी केली आहे.
0 Response to "पोलीस स्टेशन तुमसर डी. बी. पथकाची कौतुकास्पद कामगीरी."
एक टिप्पणी भेजें