-->
वैनगंगा-नळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० ते ७० लाख देण्याचा प्रस्ताव पारित! हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार – आमदार संजय मेश्राम

वैनगंगा-नळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० ते ७० लाख देण्याचा प्रस्ताव पारित! हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार – आमदार संजय मेश्राम


          संजीव भांबोरे 
साप्ताहिक "जनता की आवाज" 

भंडारा/नागपू :- वैनगंगा-नळगंगा प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्यात योग्य निधी व प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना नोकरी, या मागणीने जोरदार असून या संदर्भात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम येत्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न लावून धरणार अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर कुही येथे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार संजय मेश्राम यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्या जाणून घेतल्या.

दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी बैठकीत महत्त्वाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. त्यानुसार असिंचित शेतीसाठी प्रति एकर ५० लाख रुपये, तर सिंचित शेतीसाठी प्रति एकर ७० लाख रुपये मोबदला देण्याची मागणी करण्यात आली.

या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आगामी हिवाळी अधिवेशनात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणार असल्याचे आमदार संजय मेश्राम यांनी स्पष्ट केले.

तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांचा संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी आमदार संजय मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली कार्य समितीची स्थापना करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करताना त्यांना योग्य आणि न्याय्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणार, अशी ग्वाहीही आमदार मेश्राम यांनी यावेळी दिली.

आता या प्रस्तावावर सरकार काय भूमिका घेते आणि प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मोबदला मिळतो, याकडे कुही तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

0 Response to "वैनगंगा-नळगंगा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० ते ७० लाख देण्याचा प्रस्ताव पारित! हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणार – आमदार संजय मेश्राम"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article