ट्रॅक्टर व शेतीउपयोगी यंत्रांच्या कर्जाचे हप्ते पुढील वर्षभरासाठी माफ करा.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
• शेतकऱ्यांची मागणी : विजय रहांगडाले यांना दिले निवेदन
रितेश चौरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
तिरोडा :- यंदाच्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप धान पीक पूर्णपणे करपले आहे. राज्य शासनाने आधीच तिरोडा तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित केले.
अशा परिस्थितीत उरलेसुरले पीकही किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाचे मुख्य आर्थिक साधन असलेले खरीप धान पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर, खासगी वित्त पुरवठा कंपन्या व बँकांकडून ट्रॅक्टर, ट्रॉली व इतर शेतीउपयोगी यंत्रांकरिता घेतलेल्या कर्जाचे हप्ते एक वर्षासाठी माफ करण्यात यावेत, अशी मागणी कर्जदार शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आ. विजय रहांगडाले यांना निवेदन दिले आहे.
बँका व खासगी वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून ट्रॅक्टर व इतर यंत्रांसाठी कर्ज घेण्यात आले आहे. या कर्जाचे मासिक, त्रैमासिक व अर्धवार्षिक हप्ते डिसेंबर-२०२६, मार्च-२०२७ आणि जून-२०२७ मध्ये भरावे लागणार आहेत. मात्र, दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडल्याने हे हप्ते भरणे अशक्य झाले आहे. त्यामुळे बँकांच्या व खासगी वित्त पुरवठ्याच्या कर्जाला एक वर्षाची माफी देण्यात यावी, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात आ. विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनाची दखल घेत आ. रहांगडाले यांनी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना रविकुमार मुटकुरे, प्रकाश भोंगाडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "ट्रॅक्टर व शेतीउपयोगी यंत्रांच्या कर्जाचे हप्ते पुढील वर्षभरासाठी माफ करा."
एक टिप्पणी भेजें