खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
रितेश चौरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
आमगाव :- भारताचे पहिले पंतप्रधान, महान स्वातंत्र्यसैनिक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या आमगाव येथील जनसंपर्क कार्यालयात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका तसेच शिक्षण, विज्ञान आणि औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला रामसिंग चव्हाण, इसुलाल भालेकर, देवकांत बहेकार, अॅड. दुष्यंत किरसान, महेश उके, पिंकेश शेंडे, जगदीश चुटे, सुनील शिरसागर, योगेश कोरे, रितेश चुटे, रवी राहंगले, बाळा उके आणि श्याम देशमुख यांच्यासह काँग्रेसचे
पदाधिकारी होते. कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांना अभिवादन करून त्यांचे व कार्यकर्ते उपस्थित
व्यक्त करण्यात आला. राष्ट्रनिर्माणाचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प.
0 Response to "खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या जनसंपर्क कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी."
एक टिप्पणी भेजें