लाखनी बसस्थानक सजले पर्यावरण संदेश देणाऱ्या विविध आकाशकंदील व पणतींनी.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
• विद्यार्थ्यांनी नेचर पार्क वर तयार केले पर्यावरण संदेश देणारे आकाशकंदील व पणती.
•निसर्गमहोत्सव लाखनीचा व पर्यावरणस्नेही दिपोत्सव निमित्ताने ग्रीन नेचर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम.
संजीव भांबोरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- पर्यावरण येथील ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब लाखनी तर्फे मागील 21 वर्षापासून अखंड व सातत्याने चालू असलेला निसर्गमहोत्सव लाखनीचा व पर्यावरणस्नेही दिपोत्सव निमित्ताने पर्यावरण संदेश देणारे आकाशकंदील बनवा स्पर्धा तसेच मातीचे दिवे अर्थात पणती सजावट स्पर्धा लाखनी बसस्थानकावरील नेचर पार्कवर घेण्यात आला.
या कार्यक्रमाला संताजी पतसंस्थेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास गभणे,ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते भैय्याजी बावनकुळे, लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक श्याम गिऱ्हेपुंजे तसेच ग्रीन नेचर फाउंडेशनचे पदाधिकारी अशोक वैद्य,अशोक नंदेश्वर , प्रा. अर्चना गायधने, सेवानिवृत्त शिक्षक दिलीप भैसारे तसेच निसर्गमहोत्सव लाखनीचा या उपक्रमाचे 21 वर्षापासूनचे व ग्रीन नेचर फाउंडेशनचे संयोजक प्रा. अशोक गायधने हे उपस्थित होते. सर्वच उपस्थित अतिथींनी स्पर्धा सुरू करण्यापूर्वी स्पर्धकांना पर्यावरणस्नेही दिपावली निमित्ताने पर्यावरण संदेश देणारे आकाशकंदील व पणती सजावट कशी करावी याचे मौलिक मार्गदर्शन पर्यावरणस्नेही दिपोत्सव कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक असे पर्यावरण संदेश देणारे तसेच वन्यजीव, पक्षी, फुलपाखरे यांचे चित्र रंगविलेले आकाशदिवे व पणती अर्थात मातीचे दिवे तयार केले. यात त्यांनी फटाखा प्रदूषणामुळे व विविध प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला.
सर्वत्र लटकविलेले आकर्षक पर्यावरणस्नेही आकाशदिवे तसेच विविध जागी ठेवलेले आकर्षक पणती येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.
पर्यावरण आकाशकंदील स्पर्धेत खुल्या गटातून प्रथम क्रमांक विहान झलके व कृणाली बोपचे यांना तर आराध्या बोपचे, दिव्यांना चोले, गुंजन टेंभुर्णे यांना द्वितीय क्रमांक तर विहान चव्हाण व उन्नती देशमुख यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्ती देशमुख, योगिनी मळकाम यांना प्राप्त झाला.
शालेय गटानुसार खुशी शहारे, सौम्या वैद्य, ईशांत वैद्य, चारू वैद्य , प्राप्ती देशमुख यांना प्रथम तर काव्या वंजारी, मंथन वैद्य, आरोही देशमुख , श्रध्दा नंदेश्वर, मयंक वंजारी, गायत्री वैद्य, योगिनी मळकाम यांना द्वितीय तर तृतीय क्रमांक सृष्टी वंजारी, वेदांती वंजारी, अथर्व देशमुख, रितिका कुंभरे , श्रीनिका पाटील यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
पर्यावरण संदेश पणती सजावट स्पर्धामध्ये खुल्या गटातून प्रथम क्रमांक हर्षिता बोपचे व मंथन वैद्य यांना प्राप्त झाला तर द्वितीय क्रमांक सृष्टी वंजारी, संचिता खेडीकर, आराध्या बोपचे यांना तर तृतीय क्रमांक रितिका कुंभरे, दिव्यांना चोले यांना प्राप्त झाला तर प्रोत्साहनपर क्रमांक श्रेया नंदेश्वर, मिताली गायधनी व श्रध्दा नंदेश्वर यांना प्राप्त झाला. शालेय गटानुसार प्रथम क्रमांक अभिनंद खेडकर, वेदांती वंजारी, काव्या वंजारी , श्रेया व श्रद्धा नंदेश्वर यांना प्रथम तर सौम्या वैद्य, खुशी शहारे, यांना द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक दिव्या मते व तेजस्विनी सार्वे व श्रीनिका पाटील यांना प्राप्त झाला.
स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ नागरिक भैय्याजी बावनकुळे,प्रा.अर्चना गायधने व दिलीप भैसारे यांनी केले.निसर्गमहोत्सव लाखनीचा व पर्यावरणस्नेही दिपोत्सव उपक्रमासाठी लाखनी नगरपंचायत क्रियाशील नगरसेवक संदीप भांडारकर, नगरसेवक विपुल कांबळे, साकोली बसआगार व्यवस्थापक चोपकर, लाखनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक श्याम गिऱ्हेपुंजे, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ. मनोज आगलावे, देशमुख सिटी स्कॅन व एक्सरे सेंटरचे डॉ.प्रमोद इमदेव देशमुख, ग्रॅमी ऍग्रो एजन्सीचे प्रमुख संचालक अश्विन बनसोड, प्राचार्य प्रदीप गायधनी, शिक्षिका वैशाली गायधनी, कार्यकारी अभियंता रजत अतकरे व मुख्य कार्यकारी अभियंता ऋतुजा वंजारी, श्री हॉस्पिटलचे डॉ योगेश गिऱ्हेपुंजे व डॉ. छगन राखडे, नेत्रचिकित्सक डॉ. दिपक नवखरे, ठाणे व भिवंडी पोलिस उपायुक्त नेताराम मस्के, भैय्याजी कृषक सेवा केंद्राचे पवन बावनकुळे, डॉ. श्यामकांत तलमले पुणे,
नाना ऑप्टिकलचे नाना वाघाये, कापड व्यावसायिक रमेश गभने, वाय आर्किटेक्टचे संचालक इंजि.चंद्रकांत ढवळे, डॉ. टिकेश्वर करंजेकर, पोलिस राजू बडवाईक, निर्वाण इलेक्ट्रिकल्सचे भूपेंद्र (बाळु) निर्वाण, श्रीसाई सायकल स्टोअर्सचे सोहित गिऱ्हेपुंजे,सेवानिवृत्त प्राचार्य अशोक हलमारे, सेवानिवृत्त महसूल अधिकारी गोपाल बोरकर,अमृत महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक ओंकार हरदास अनिल मोटर्सचे अनिल व ज्ञानेश्वर गायधने इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अथक परिश्रम घेतले.
0 Response to "लाखनी बसस्थानक सजले पर्यावरण संदेश देणाऱ्या विविध आकाशकंदील व पणतींनी."
एक टिप्पणी भेजें