-->
रॉकेट फटाक्यामुळे घराला आग; एक लाख रुपयांचे नुकसान.

रॉकेट फटाक्यामुळे घराला आग; एक लाख रुपयांचे नुकसान.




एकोडी येथील गुजरी चौकातील घटना.

                संजीव भांबोरे 
साप्ताहिक"जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली तालुक्यातील एकोडी येथील गुजरी चौक परिसरात दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास रॉकेट फटाक्यामुळे लागलेल्या आगीत राजकुमार दादू मेश्राम यांचे घर जळून फार मोठे नुकसान झाले. या घटनेत घरातील धान्य, तांदूळ, गहू, डाळ, कपडे,आलमारी,ड्रम, बालटी, सुटकेस , संसारोपयोगी,बेडशीट,ब्लॅंकेट, घरावरील फाटे, लाकूड जळून खाक झाले.
      राजकुमार मेश्राम हे व्यवसायाने टेलर असल्याने दिवाळी निमित्ताने ग्राहकांचे नवीन कपडे जे शिवायला आले ते सुद्धा जळून खाक झाले असून अंदाजे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सर्वजण झोपले असताना अचानक काहीतरी फुटल्याचा आवाज आला. या आवाजाने वर्षा मेश्राम यांना जाग आली. त्यावेळी घराला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गुजरी चौक परिसरात अज्ञात व्यक्तीने फोडलेला रॉकेट फटाका हवेत फुटून त्याचा जळता भाग घरावर पडल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
         या आगीच्या घटनेमुळे मेश्राम कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली आहे. फटाके फोडताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, जेणेकरून अशा घटनांमुळे इतरांच्या घरांचे व मालमत्तेचे नुकसान होणार नाही. त्यावेळी पंचनामा करतांना एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे,ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, ग्रामपंचायत शिपाई दिलीप चौधरी, कोतवाल दिलीप शहारे, कार्तिक मेश्राम, आशिष निपाने तसेच मेश्राम कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.

0 Response to "रॉकेट फटाक्यामुळे घराला आग; एक लाख रुपयांचे नुकसान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article