मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्या! ग्रामपंचायतवर प्रशासक बसला !गावाचा विकास खुंटला?.
शनिवार, 14 नवंबर 2026
Comment
संजीव भांबोरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर प्रशासक बसल्यामुळे व एकाच प्रशासकाकडे सात-आठ ग्रामपंचायतचा कारभार असल्यामुळे ते एकाही गावाकडे बरोबर लक्ष देत नाही.
त्यामुळे गावाच्या छोट्या-मोठ्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे .आज जवळपास बऱ्याच ग्रामपंचायतीची मुदत मागील 8/9 महिन्यापासून संपलेली आहे. परंतु अजून पर्यंत निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत चा विकास खुंटलेला आहे. त्यातच पहेला येथील सुद्धा ग्रामपंचायती मुदत संपलेली असून रस्त्याच्या मधोमध जे डिव्हाइडर नाली मागील 6 महिन्यापूर्वी बनविण्यात आली पण त्या नालीचे कव्हर तुटल्याने दुर्गंधी येत आहे. सदर नालीचे काम ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यानेच केले आहे .याबाबत ग्रामपंचायत मध्ये दोन महिन्यापूर्वी ठराव सुद्धा घेण्यात आला होता. त्याच रस्त्याच्या समोरील भागात नाली तुटली असून रस्ता अरुंद झालेला आहे. त्यामुळे गाडी येजा करिता अडचणी निर्माण होत आहे.याबाबतीत ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांनासुद्धा अनेकदा सांगण्यात आले पण त्याकडे त्यांचे सुद्धा दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायत अधिकारी गेडाम यांना सांगितले असता प्रशासक भगत यांच्याकडे बोट दाखवतात. आज येणार उद्या येणार परंतु दोन महिने झाले त्याकडे दुर्लक्ष आहे. लहान लहान कामाकडे त्यांचे लक्ष नसतील तर ते फक्त ग्रामपंचायत बसूनच गावाच्या विकासाकडे लक्ष देतात काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
0 Response to "मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्या! ग्रामपंचायतवर प्रशासक बसला !गावाचा विकास खुंटला?."
एक टिप्पणी भेजें