तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी... भव्य एक दिवसीय "बौद्ध धम्म परिषदे"चे आयोजन.
मंगलवार, 17 नवंबर 2026
Comment
उमेश बोरकर.
साप्ताहिक "जनता की आवाज"
भंडारा/साकोली :- अर्जुनी/मोर तालुक्यातील कन्नाडगाव/ रिटी/ वडेगाव रोड अर्जुनी मो, तथागत समृद्धी सेवाभावी संस्था इंटरनॅशनल बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन सेंटर च्या वतीने भव्य "एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे"आयोजन दिनांक 21 नोव्हेंबर 2026 रोज शनिवारला जेतवन ध्यान भूमी एज्युकेशन सेंटर वडेगाव स्टेशन रोड कन्नाडगाव/ सिटी येथे आयोजन केले आहे.
सकाळी ०८:०० वाजता धम्म रॅली ०९:०० वाजता धम्म ध्वजारोहण. ०९:३० वाजता भिक्खू संघाचे भोजनदान. दुपारी ०४:०० वाजता लेझीम नृत्य. दुपारी०४:३० वाजता समता सैनिक दल यांचा स्वागत सोहळा पार पडेल. तसेच रात्री ०७:०० वाजता प्रबोधनात्मक "बुद्ध भीम" गीतांचा संगीतमय कवाली व आर्केस्ट्रा चा कार्यक्रम आयोजित केला आहे. सादर कर्ते- कवी गायक उमेश बोरकर व संच साकोली यांच्या भीम गीतांचा सदाबहार कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. संजय सिंह शिरसाट आमदार तथा सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन, मा. तेलगोटे मॅडम सहाय्यक आयुक्त नागपूर सामाजिक विभाग, सह उद्घाटक प्रफुल पटेल राज्यसभा खासदार, मा. राजेंद्र जैन राज्यसभा खासदार, प्रशांत पडोळे खासदार भंडारा गोंदिया, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. राजकुमार बडोले साहेब आमदार अर्जुनी/ मोर विधानसभा क्षेत्र तथा माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र शासन, दीप प्रज्वलन मा. नानाभाऊ पटोले आमदार साकोली विधानसभा क्षेत्र, मा.विजय भाऊ वडट्टीवार आमदार तथा विरोधी पक्ष नेता ब्रह्मपुरी, मा. अविनाश ब्राह्मणकर आमदार विधान परिषद भंडारा गोंदिया, मा. रामदास मसराम आमदार विधानसभा क्षेत्र आरमोरी, मा. विनोद अग्रवाल आमदार गोंदिया, मा. विजय रहांगडाले आमदार तिरोडा विधानसभा क्षेत्र, मा.संजय पुराम आमदार खामगाव/ देवरी विधानसभा क्षेत्र, मा. नरेंद्र भोंडेकर आमदार भंडारा, मा. गोपालदास अग्रवाल माजी आमदार, मा. कृष्णा गजभिये माजी आमदार, मा. दिलीप बन्सोड माजी आमदार, मा. मनोहर चंद्रिकापुरे माजी आमदार अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्र, मा.सहसराम कोरेटी माजी आमदार, मा. धर्मदास शहारे एच.डी. पब्लिसिटी आणि ॲडव्हर टायझिंग कंपनी, मा. भैसारे साहेब उद्योगपती वडसा. प्रमुख अतिथी म्हणून मा.लायकराम भेंडारकर अध्यक्ष जि.प. गोंदिया, मा.रत्नदीप दहिवले अध्यक्ष प्रज्ञा शिक्षण संस्था, मा. यशवंत गणवीर, मा.पौर्णिमा ताई उमाकांजी ढेंगे जि.प. महिला बालकल्याण सभापती, मा. शितलताई राऊत समाज कल्याण सभापती जि.प. भंडारा, मा.आम्रपालीताई डोंगरवार सभापती पं. समीती, मा. चंद्र सुदर्शन डोंगरवार गडचिरोली, मा.डॉ. नंदेश्वर सर बारवा, मा.अनिरुद्ध कांबळे तहसीलदार साहेब, मा.डॉ. भारत लाडे, मा. किरण ताई कांबळे माजी जी. प. सदस्य, मा.अजय लांजेवार संस्थापक एस. चंद्रा. विद्यालय, मा.राजेश नंदा गवळी माजी समाज कल्याण सभापती, मा. श्रीकांत घाटबांधे जि. प.सदस्य, मा.रचनाताई गहाणे जि. प. सदस्य, मा. अनिल दहिवले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, मा.दानेश साखरे नगरसेवक, मा.रेखाताई वासनिक माजी समाज कल्याण सभापती भंडारा व आलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडेल. बौद्ध उपासक व उपसिका तसेच सर्व जनतेनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रामनेर अश्वजीत भन्ते यांनी केले आहे. टिप: (1)उपासक आणि उपासिका यांनी पांढरे वस्त्र धारण करून यावे. (2) जेतवन ध्यान भुमी वडेगाव/ रेल्वे पूर्वेश २ कि. मी. अंतरावर आहे. आणी ईटखेड्या वरून पश्चिमेस १ कि. मी. अंतरावर आहे.
0 Response to "तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी... भव्य एक दिवसीय "बौद्ध धम्म परिषदे"चे आयोजन."
एक टिप्पणी भेजें