भंडारा तालुक्यातील पागोरा येथील लिओलिफिन पॉली प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला गावकऱ्यांच्या विरोध.
मंगलवार, 17 नवंबर 2026
Comment
• ग्रामसभेत अनेक ठराव पारित
संजीव भांबोरे
साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील निमगाव पाघोरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पागोरा येथे आज दिनांक 17 नोव्हेंबर 2026 ला दुपारी 12 वाजता पॉली लिओरिफिन प्लास्टिक प्रायव्हेट कंपनीला निमगाव ग्रामपंचायत मध्ये प्रशासक काळात जी एनओसी देण्यात आली.
ती रद्द करण्यात यावी .याकरिता विशेष ग्रामसभेचे पागोरा येथे आयोजन करण्यात आले होते .या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आणि अनेक मुद्दे उपस्थित करून लिओलिफिन प्लास्टिक कंपनीला जी एन ओ सी देण्यात आली ती रद्द करण्यात यावी, कंपनीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे, ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर कारवाई करण्यात यावी व इतर विषयावर चर्चा करण्यात आली. एनओसी रद्द व कंपनीचे काम तात्काळ बंद न झाल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे.
0 Response to "भंडारा तालुक्यातील पागोरा येथील लिओलिफिन पॉली प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला गावकऱ्यांच्या विरोध. "
एक टिप्पणी भेजें