-->
 दोन टप्प्यात,जातीनिहाय जनगणना सुरू होणार

दोन टप्प्यात,जातीनिहाय जनगणना सुरू होणार

  • प्रत्येकाला ३० हून अधिक प्रश्न विचारणार

Image Source : Muslimmirror.com


नवी दिल्ली वृत्तसंस्था : भारताची पहिली जनगणना १८७१ ला जी.डब्ल्यू.सी.प्लाडेन यांनी आयोजित केली व व्हाईसरॉय लार्ड मेयो ब्रिटिश राजवटीने १८८१ ते १९३१या कालावधीत जातीनिहाय जनगणना केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक देशात करण्यात आलेल्या जनगणना मधून जातीच्या कलम वगळण्यात आला होता प्रजासत्ताक भारतात प्रथमच जातीनिहाय जनगणना होत आहे यापूर्वी अखेरची जनगणना २०११ मध्ये झाले होती.ही भारताची १६ व स्वतंत्र प्राप्तीनंतर ८ जनगणना असेल नागरिकांना 30 गुण अधिक प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील यामध्ये नाव लिंग वय जन्मतारीख वैवाहिक स्थिती कुटुंबप्रमुखाचे असलेले नाते जात उपजात धर्म शिक्षण रोजगार स्वतःचे घर आहे की भांड्याचे घर कोणत्या प्रकारात मोडतो टेलिफोन आहे का मोबाईल आहे का इंटरनेट वापरता का फोर व्हीलर टू व्हीलर वाहने किती आहेत पाण्याचा स्त्रोत्र आहे.का?अशी अनेक माहिती विचारली जाणार आहे.असे केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेसाठी अधिसूचना काढली आहे.जनगणना दोन टप्प्यात होणार असून सुमारे सुमारे ३४लाख प्रगनक आणि पर्यवेक्षक तसेच १लाख तीस हजार जनगणना अधिकारी,आधुनिक मोबाईल व डिजिटल उपकरणाचा जनगणना करतील जनगणनेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १३ हजार कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनानुसार जनगणनेचा पहिला टप्पा १ ऑक्टोंबर २०२६ ला सुरू होईल यात पहिला टप्प्यात जम्मू-काश्मीर,लदाख हे केंद्रशासित प्रदेश आणि हिमाचल प्रदेश,उत्तराखंड ही दोन राज्य या ठिकाणी जनगणना सुरू होईल.१ मार्च २०१७ पासून दुसरा टप्पा महाराष्ट्राचा इतर राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये जनगणना करण्यात येईल या जनगणने सोबत जातीनिहाय जनगणना देखील करण्यात येणार आहे.

0 Response to " दोन टप्प्यात,जातीनिहाय जनगणना सुरू होणार"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article