भारत मुक्ती मोर्चा च्या 1 जुलै भारत बंद जनआंदोलनाला अपूर्व प्रतिसाद
- 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय संघटना चा सक्रीय सहभाग
- अनेक महामार्ग बंद करण्यात आल्याने वाहतूक ठप्प
प्रतिनिधी
भंडारा :- भारत मुक्ती मोर्चा या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 1 जुलै भारत बंद ला सर्व स्थरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला , भारतातील 36 राज्यातील ,650 जिल्ह्यातील , 5 हजार तालुक्यातील , 22 हजार विभागातील 4 लाख गावातील लोकांनी यात सामावेश होता.
त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील लोकांनी एकत्र येऊन भारत बंद सफल केले , यात प्रामुख्याने राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा ,राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा , राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा , बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क , राष्ट्रीय किसान मोर्चा , छत्रपती क्रांती सेना ,राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद , भारतीय विद्यार्थी ,युवा ,बेरोजगार मोर्चा ,स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा घोषित करणारी जगातील एकमेव पार्टी , बहुजन मुक्ती पार्टी , अशा शेकडो राष्ट्रीय संघटनेचे लोक सहभागी होते , ईव्हीएम मशीन बंद करून बैलट पेपर वर चुनाव केले जावे , संसदीय लोकशाही प्रणाली लागु करावी , अमित शहा ने देशाची जाहीर माफी मागावी ,बौद्धगया विदेशी ब्राम्हणापासून मुक्त करून मूलनिवासी बौद्ध धर्माच्या ताब्यात देण्यात यावी , वक्फ बोर्ड संशोधन विधेयक 2025 रद्द करण्यात यावे , स्मार्ट (रिचार्ज वाला मीटर ) विरोध अपार आय डी विरोध , बोगस बी बियाणे , खतांच्या वाढीव किमती , शिक्षण बाजारीकरण , सोलार शक्ती , जीवनावश्यक वस्तूंच्या वाढीव किमती , शेतकरी कर्ज मुक्ती , निराधार लोकांचे थकीत पैसे , वाढती बेकायदेशीर बेरोजगारी , अशा अनेक प्रकारच्या समस्या विरोधात भारत बंद चे आयोजन केले होते, भंडारा जिल्ह्यातील शास्त्री चौकातून रॅली ला सुरुवात होऊन सरकार विरोधात नारेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रॅली चे समारोप झाले , आमच्या मागण्या वेळीच पूर्ण झाल्या नाही तर आणखी प्रत्येक महिन्याला भारत बंद चे आयोजन केले जाईल , याची शासन प्रशासन ,लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने नोंद घ्यावी असे भारत मुक्ती मोर्चा व सहयोगी संघटना नी आमच्या प्रतिनिधी ला सांगितले.
.jpeg)
0 Response to " भारत मुक्ती मोर्चा च्या 1 जुलै भारत बंद जनआंदोलनाला अपूर्व प्रतिसाद"
एक टिप्पणी भेजें