-->
 उल्हासनगर 4 येथील प्रभाग क्र 17 येथील ड्रेनेजच झाकण तुटल्यामुळ रिक्षाचा अपघात वरीष्ठ अधिकाऱ्यचे कामाकडे दुर्लक्ष..!

उल्हासनगर 4 येथील प्रभाग क्र 17 येथील ड्रेनेजच झाकण तुटल्यामुळ रिक्षाचा अपघात वरीष्ठ अधिकाऱ्यचे कामाकडे दुर्लक्ष..!

सोनू संजीव क्षेत्रे

उल्हासनगर :- उल्हासनगर पूर्व येथील प्रभाग समिती ४ येथील दहा चाळ ब्लॉक न २९८,येथील सिंधू वर्षा आश्रम समोर गेल्या १५ दिवसा पासून द्रणेजचे झाकण तुटल्या मुळे रोज एक नविन अपघात होत आहे.

सदर विषयाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पाणी पुरवठा विभाग यांच्या कडे केली असून दोन्ही विभागाने येऊन पाहणी केली असून , सदर चे झाकण बसवणार कोण याची अजून ही चर्चा चालू असून दोन्ही विभाग एक दुसऱ्यावर ढकलत आहेत ते झाकण असेच तुटलेल्या अवस्थेत असून त्या काल एक दुर्घटना घडली असून अभियंता साहेब अजून किती दिवस वाट पाहायला लावणार आहात की सर्व सामान्य माणूस मारण्याची वाट बघत आहात या परिसरात लहान लहान मुले खेळत असतात जर खेळता खेळता त्या द्रेनेजच्या मद्ये पडला तर महानगर पालिका जिम्मेदार राहील का ? की तुम्ही जिम्मेदार राहाल 

त्या हातावरच्या पोट असणाऱ्या रिक्षा चालकाची रिक्षाचा चे पुढचे टायर चेंबर मद्ये  फासला गेला त्याची भरपाई अभियंता किंवा बांधकाम विभाग देणार की महानगर पालिका देणार ?  जर असा असेल तर तुमची भूमिका सामोरं येऊन स्पष्ट करा आम्ही पण तुम्हाला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत. तक्रार करण्यासाठी कार्यालयामधे तुम्ही दिसतं नाहीत. मग तक्रार तरी कोणाला करायची असा प्रश्न पडतो.          

  दोन्ही विभागाच्या भांडणात स्थानिक नागरिक संतापलेला आहे तसेच शाळेच्या रिक्षा चालकांना याचा नाहक त्रास होत असून अजून किती अपघाताची वाट दोन्ही विभाग पाहत आहे .तरी दोन्ही विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे की ते तुटलेले झाकण बसून द्यावे जेणे करून त्या तुटलेल्या झाकणं मुळे एखादा मोठा अपघात होणार नाही. तरी ॲड प्रशांत चंदनशिव यांनी संताप व्यक्त केला असून अभियंता आणि बांधकाम विभाग यांचा वर कारवाही करण्याची मागणी केली आहे.


0 Response to " उल्हासनगर 4 येथील प्रभाग क्र 17 येथील ड्रेनेजच झाकण तुटल्यामुळ रिक्षाचा अपघात वरीष्ठ अधिकाऱ्यचे कामाकडे दुर्लक्ष..! "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article