
आशिर्वाद नगर गिरोला येथे अपूर्ण गटारीचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठरत आहे धोकादायक.
- अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी
- मागणी पूर्ण न झाल्यास ,प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना एकत्र करून न्याय मिळवून देणार. जननायक ,लोकगौरव ,सामाजिक कार्यकर्ते अभय डी रंगारी च्या नेतृत्वाखाली कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलनाचा गंभीर इशारा.
"साप्ता.जनता की आवाज"
भडांरा :- आंबाडी, ४ जुलै: आंबाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आशिर्वाद नगर गिऱोलायेथील नागरिक सध्या अपूर्ण गटारीच्या कामामुळे जीवघेण्या संकटात सापडले आहेत. एक महिन्यापूर्वी श्री. गडपायले यांच्या घरापासून श्री. लुटे यांच्या घरापर्यंत नवीन नाली बनवन्यात आली. मात्र, खोदकामानंतर जी माती बाहेर काढली गेली, ती रस्त्यावरच पसरलेली आहे.
सध्या अंदाजे ७५% सिमेंटचा रस्ता चिकट मातीने झाकलेला आहे. पावसाळा सुरू झाल्याने रस्ता घसरडा झाला असून अनेक अपघात घडले आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे विशेषतः मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
ठेकेदाराने काम पूर्ण केल्यानंतर संपूर्ण परिसर स्वच्छ करून रस्ता पूर्ववत करणे अपेक्षित होते. मात्र, हे काम पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आले आहे. या गटारीवर झाकणही घातले गेलेले नाहीत, त्यामुळे नागरिक, विशेषतः मुले आणि वृद्ध यांना गटारीत पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
"आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण लोकांच्या जीवाशी खेळणारे अपूर्ण काम आमच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. ग्रामपंचायत गप्प का बसली आहे? अपघात रोज घडत आहेत, तरी कोणीही जबाबदारी घेत नाही," असे संतप्त रहिवाशाने सांगितले.
या परिस्थितीत ग्रामपंचायतीने आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. रस्त्यावरील माती त्वरित हटवावी आणि संपूर्ण गटारीला सुरक्षित झाकण लावावे.
जर हे दुर्लक्षित राहिले, तर मोठा अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तोपर्यंत, आशिर्वाद नगर गिऱोला येथील नागरिक दररोज जीव मुठीत धरून या घसरड्या रस्त्यावरून आणि उघड्या गटाऱ्याजवळून प्रवास करत आहेत.
सदर समस्या वेळीच दूर झाली नाही तर , आम्ही परिसरातील समस्या ग्रस्त जनता कोणत्याही प्रकारचा टॅक्स किंवा कर देणार नाही , आणि प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना एकत्र करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाच्या तेजाने जनतेला आपलेसे करणारे जननायक लोकगौरव सामाजिक कार्यकर्ते अभय डी रंगारी च्या नेतृत्वात कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्यात येणार आहे , याची शासन , प्रशासन , लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने नोंद घ्यावी , असे समस्या पीडित नागरिकांनी आमच्या प्रतिनिधी ला सांगितले.
0 Response to " आशिर्वाद नगर गिरोला येथे अपूर्ण गटारीचे काम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठरत आहे धोकादायक."
एक टिप्पणी भेजें