-->

Happy Diwali

Happy Diwali
महाबोधी टेम्पल बुद्धगया सुप्रीम कोर्टात पुन्हा 5 ऑगस्ट ला तारीख

महाबोधी टेम्पल बुद्धगया सुप्रीम कोर्टात पुन्हा 5 ऑगस्ट ला तारीख


  
संजीव भांबोरे (म.प्र.नी)
''साप्ता.जनता की आवाज" 
नागपूर :- मंगळवार 29 जुलै 2025 ला सुप्रीम कोर्ट दिल्ली येथे तारीख होती. त्या संदर्भात, बुधवार दिनांक 28 जुलै 2025, ला अधिकृत एडवोकेट श्रेय रवी डंभारे(ऑन रेकॉर्ड ऐडवोकेट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली) व ऐडवोकेट शैलेश नारनवरे सर (वरिष्ठ ऐडवोकेट सुप्रीम कोर्ट, नागपूर) यांनी या पिटिशन काही तृटी पूर्णतः केली व 2018 ला इटरवेनर भन्ते धम्मशिखर, भन्ते विनयबोधी भन्ते नागसेन हे असून 28-29 जुलै 2025 ला कोर्टात उपस्थित होते .या वेळी मुख्य पिटिशनर आर्य नागार्जुन सुरई ससाई व गजेंद्र महादेव पानतावणे म्हणून उपस्थित होते .
पूज्य भदंत विनयबोधी, पूज्य भदंत नागसेन हे 1992 पासुन महाबोधी महाविहार मूक्ति आंदोलना मध्ये आपले समस्त आयुष्य समर्पित केलेलें दिसतें , आर्य नागार्जुन सुरई ससाई जीं नी जेव्हा पासून हे आंदोलन सुरू केले तेव्हा पासून तर आज पर्यंत मोठ्या परिश्रमाने महाबोधी महाविहाराच्या संदर्भात प्रचार प्रसार केला. महाबोधी महाविहाराच्या मूक्ति करीता आज ही सुप्रीम कोर्टात इंटरवेंशन पिटीशन घालून 2018 पासून लढा देत आहे. 
मंगळवार 29 जुलै 2025 ला महाबोधी टेम्पल बुद्धगया यासंदर्भात सुप्रीम कोर्टात कोर्ट रूम नंबर 2 मध्ये. न्यायामुर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती बागची या डबल बेंच पुढे उपरोक्त केस सुनावणी करिता होती. महाबोधी टेम्पल बुद्धगया केसचा नंबर 40 होता. त्यापूर्वी 39 केस सुनावणी करिता होते. बेंच पुढे त्या दिवशीची 9 नंबर आले व नंबर 10 केसने बेंच पुढे दुपारचे साडे तीन वाजेपर्यंत सुनवाई सुरू होती. जी ओबीसी आरक्षण संदर्भात होती. तिलाच वेळ लागला व सुप्रीमकोर्ट ने बाकीच्या उरलेल्या सर्व पीटिशन धाऱ्यांना पुढील तारीख दिली गेली. त्यामध्ये महाबोधी टेम्पल बुद्धगया पीटिशन केसला नवीन date 5 ऑगस्ट 2025 मिळालेली आहे.

0 Response to "महाबोधी टेम्पल बुद्धगया सुप्रीम कोर्टात पुन्हा 5 ऑगस्ट ला तारीख"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article