धान ऊंत्पादन शेतकरी बोनस च्या प्रतिक्षेत!..
बुधवार, 30 जुलाई 2025
 Comment 
• सरकार,मार्केटिंग फेडरेशन, व धान खरेदी संस्था यांनी शेतकऱ्यांना फसवले.
 "'साप्ता.जनता की आवाज" 
तिरोडा प्रतिनिधी :- निवडणूक काळात शेतकर्याची मते घेण्यासाठी धानाला हेक्टरी पचविसहजार बोनस देऊ असे तिरोडा निवडणूक प्रचार सभेत मां.मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली त्या सभेत जिल्ह्यातील सर्व आताचे मा.आमदार हजर होते बोनसच्या घोषनेने शेतकर्यानी भरभरून मतदान केले.परतु ज्या वेळेस प्रत्यक्षात बोनसची विसहजार प्रति हेक्टरी घोषणा झाली त्या वेळी एकही आमदार बोलले नाही की आपण शेतकऱ्यांना पचविसहजार बोनस देऊ घोषणा केली. कारण हेच आहे!."गरज सरो वैध्द मरो" हे निती आजच्या सरकार ची आहे .सहा महिने झाले आजही पन्नास टक्के शेतकर्याना बोनस मिळाले नाही. त्या मधे प्रत्यक्षात धान खरेदी केन्दावर धान दिले त्यानाही बोनस मिळाले नाही. नवेझरी येथील पांडव सहकारी संस्था येथील प्रत्यक्षात धान्य विक्री केले त्या १५० शेतकऱ्यांना बोनस मिळाले नाही संस्थेच्या मँनेजरला विचारले तर मार्केटिंग फेंडरेशन चे नाव सांगतात व पणन अधिकारी यांना विचारले तर संस्थेला खाते हँरीफीकेशन करायला सांगितले ते  जेव्हा दुरुस्ती करून देणार तेव्हा बघू.दोन्ही संस्था ऊळवाउळवि चे ऊत्तर देतात. अशा वेळेस शेतकर्यानी काय करावे. सरकार ,मार्केटिंग फेडरेशन, धान खरेदी संस्था यांनी दि १/८/२०२५ दिनांक पर्यंत शेतकऱ्यांना बोनस त्यांच्या खात्यात जमा केले नाही तर उग्र आंदोलन करु जो पर्यंत बोनस मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल.कीवा आत्मदहन सुद्धा करू.असा इशारा शेकर्यानी दिला.
0 Response to "धान ऊंत्पादन शेतकरी बोनस च्या प्रतिक्षेत!.."
एक टिप्पणी भेजें