गुरुपौर्णिमा आणि आषाढघन विशेष कवीसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
रविवार, 13 जुलाई 2025
Comment
भडांरा :- अखिल भारतीय साहित्य परिषद शाखा भंडारा व विदर्भ साहित्य संघ लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या पावन-पर्वावर भव्य साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन समर्थ महाविद्यालय लाखनी येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी भूषविले कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय गभने यांनी प्रास्ताविकेतून साहित्याच्या योगदानाविषयी मत व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. परिषदेच्या समन्वयक अर्चनाताई गुरवे, विदर्भ साहित्य संघाच्या कार्यवाहक डॉ. मुक्ताताई आगासे, अध्यक्ष हरिभाऊ मोहतुरे ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार प्रल्हाद सोनवणे उपस्थित होते.
सुषमा पडोळे, मंगला डहाके, रेणुका झंजाळ, कमल सर्वे, जयश्री वाघ,अर्चना गुरवे, वामन गुरुवे, मेघा भांडारकर,अंजली खंडाईत, डॉ .विद्या ठवकर,डॉ. संजय कुमार निंबेकर, शिवानी काटकर, सारिका दोनोडे, बाबुराव निखाडे, दिनेश पंचबुद्धे,अर्चना सार्वे,श्रेया काडगाये, चंद्रहास खंडारे, कीर्ती शेंडे या कवी कवयित्रींनी आषाढ घन व गुरुपौर्णिमा या विषयावर आधारित सृजनशील काव्य सादर केले. या कविता निसर्गातील अनुभूती, गुरु शिष्य परंपरा व मानवी भावभावनांचे दर्शन घडवणाऱ्या होत्या.साहित्य रसिकांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली. यावेळी डॉ. स्मिता गजभिये तिरपुडे यांच्या एम.ए. प्रथम वर्ष, प्रथम सत्र 'पूर्वबाल्यावस्था काळजी आणि शिक्षण' या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुरुतत्त्वाची साहित्याशी नाळ जोडत विचार प्रवण मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी साहित्यिक उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम ग्रामीण पातळीवरही पोहोचावेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता गजभिये तर आभार मंगला डहाकेनी व्यक्त केले.
या समारंभात भंडारा व लाखनी परिसरातील साहित्य प्रेमी,मान्यवर विद्यार्थी व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने भरलेला हा साहित्यिक सोहळा रसिकांच्या मनात दीर्घकाळ कोरला गेला.
0 Response to "गुरुपौर्णिमा आणि आषाढघन विशेष कवीसंमेलन व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न"
एक टिप्पणी भेजें