-->
शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करा...

शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करा...

  • सार्वभौम युवा मंच जि. भंडारा ची मागणी


नरेन्द्र मेश्राम 'साप्ता जनता की आवाज" 

भंडारा : देशाच्या पोशिंदा असणारे शेतकरी आज नैसर्गिक आणि कृत्रिम समस्याना समोर जाऊन देशाच्या उपजिवीका सांभाळण्यासाठी शेती करतो परंतु आज स्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन तीन वर्षात हंगामी पिके व निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांवर व शेति संसाधनानां जबर फटका बसला असुन शेतकरी निसर्गाच्या प्रकोपामुळे हवालदील झाला आहे. त्यात शेती लागत मुल्य जास्त असुन नफा न्युनतम होत आहे. त्यामुळे असंख्य शेतकरी आत्महत्या करत असुन दोन ते तीन वर्षापासुन शेतकरी हा लागत कर्जाच्या चक्रवृहात फसला असुन मरण यातना शोषत आहेत शेतकऱ्यां 

चे पिक, औषधी, औजारे व इलेक्ट्रीसिटी ई. संसाधनाच्या बोज्याखाली दबुन त्याच पारिवारीक जन-जिवन उध्वस्त झाले आहे.

करीता शेतकऱ्यांचा सन्मान टिकवुन ठेवन्यासाठी आणि त्यांच्या पिकाचा पुर्ण मोबदला मिळावा व सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी व शेतकऱ्याना सुजलाम सुफलाम कराव

या प्रमुख मागण्यासाठी, सार्वभौम युवा मंच जि.भंडारा तर्फे लाखनी तहसील मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी नेहाल कांबळे अध्यक्ष, दिपक जनबंधू संयोजक, विजय रंगारी सल्लागार, धीरज गोस्वामी सल्लागार, अविश लांडगे, अतुल कांबळे, अजय रामटेके, राहुल कांबळे, अंकित बडोले उपस्थित होते..

0 Response to "शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करा..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article