-->

Happy Diwali

Happy Diwali
 "नैसर्गिक शेती: टिकाऊ उत्पादनाची गुरुकिल्ली" -  अजयकुमार राऊत  (प्रकल्प उपसंचालक आत्मा,भंडारा)

"नैसर्गिक शेती: टिकाऊ उत्पादनाची गुरुकिल्ली" - अजयकुमार राऊत (प्रकल्प उपसंचालक आत्मा,भंडारा)

कुलदीप गंधे 


जनता की आवाज

भंडारा जिल्हा प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा),तालुका भंडारा अंतर्गत दिनांक १४ जुलै २०२५ ला मौजा  पहेला येथिल तालुका बीज गुणन प्रक्षेत्र येथे येथे क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

सर्वप्रथम कर्मवीर डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

 सदर कार्यक्रमाला परिसरातील ७५ ते ९० शेतकरी, प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी उत्पादक कं.प्रतिनिधी उपस्थित होते.

नैसर्गिक,एकात्मिक शेती, शाश्वत शेती शेतीचे अर्थकारण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन , चिकट सापळे आणि कीड व रोगांची तीव्रता या संपूर्ण बाबीचा सखोल अभ्यास करून फवारणी आणि पिकाचे व्यवस्थापन करावे जेणेकरून शाश्वत आणि नैसर्गिक उत्पादन आणि त्यासाठी लागणारा खर्च हासुद्धा नगण्य असेल तरच शेती ही शाश्वत असेल असे प्रतिपादन आणि मार्गदर्शनपर भाषण क्षेत्रिय किसान गोष्टी कार्यक्रमाला उपस्थित उप प्रकल्प संचालक आत्मा,भंडारा अजय राऊत यांनी शेतकरी बांधवाना केले. 

उत्पादन आणि उत्पादनाला लागणार खर्च यांच्या नोंदी ठेवून ताळेबंद आणि त्यानुसार खर्च करावा असे प्रतिपादन केले.

 वृषाली देशमुख जिल्हा मृद सर्व्हेक्षण व मृद चाचणी अधिकारी भंडारा यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना माती हाच खरा  जमिनीचा आत्मा असून सर्वात अमूल्य देणगी आणि संपत्ती असेल ती म्हणजे माती होय.

मातृभूमीला जिवंत ठेवण्याकरिता जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणूंची वाढ होईल या उद्देशाने शेतकरी बांधवांनी शेतात कंपोस्ट खत,हिरवळीचे खत,वापर करावा त्यामुळे जमिनीचे भौतिक गुणधर्मात सुधारणा होईल.

मृद आरोग्य पत्रिकेकेनुसार खतांचा संतुलित वापर करावा असे मोलाचे आणि सविस्तर मार्गदर्शन उपस्थितशेतकरी बांधवांना केले.

 शेतकरी मनोगत 

 तानाजी गोपाळ गायधने कृषी भूषण, शेतकरी सेंद्रिय शेती शेतकरी बांधवांनी केवळ भात पिकावर अवलंबून न राहता,भाजीपाला, फळबाग, आणि कुक्कुटपालन, त्याचबरोबर कमीत कमी रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खते, किड व्यवस्थानाकरिता चिकट सापळे अशा विविध यांत्रिक, भौतिक, जैविक आणि मशागतीय पद्धतीचा किड नियंत्रणाकरिता अवलंब करून शाश्वत उत्पादन घ्यावे असे मोलाचे शेतकरी मनोगत आणि मार्गदर्शन केले.


 प्रकाश गोपीचंद मस्के, वसंतराव नाईक कृषि भूषण शेतकरी, मऊ डव्वा यांनी उपस्थितांना कारली, वांगी, लागवड तंत्रज्ञान उत्पादन घेत असताना जमिनीचे सोलरझजेशन, अमावस्या, पौर्णिमेचे कीड व्यवस्थापनातील महत्व आणि त्याचे फायदे याबद्दल  सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकरी बांधवाना केले.

 पद्माकर चाकोले संचालक आरोग्य ज्योती शेतकरी उत्पादक कंपनी परसोडी यांनी उपस्थित यांना शेत बांधावरील प्रयोग शाळेमध्ये दहा ड्रम थेरी या घटकाबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना ह्युमिक ऍसिड, ट्रायकोडर्मा, दशपर्णी अर्क, सप्त धान्य स्लरी या नैसर्गिक निविष्ठाचा वापर करून  उत्पादन खर्चामध्ये बचत करून शाश्वत आणि नैसर्गिक उत्पादन करावे असे शेतकरी मनोगत व्यक्त केले.

 दादाभाई वाहणे कृषी पदवी प्राप्त प्रगतशील शेतकरी यांनी उपस्थितांना कारली, काकडी, ढेमसा लागवड तंत्रज्ञान, आणि त्यावरील एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन एकात्मिक खत व्यवस्थापन याबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.

सदर किसान गोष्टी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पहेला गावचे प्रथम नागरिक सरपंच मा. सौ.मंगलाताई ठवकर, प्रमुख उद्घाटक म्हणून मा.सौ.आचललताई चवळे पंचायत समिती सदस्य, भंडारा प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री.देवानंद चौधरी कृषि भूषण शेतकरीआमगाव मा.श्री. सुभाष भाऊ आजबले उपाध्यक्ष काँग्रेस पक्ष भंडारा जिल्हा तथा अध्यक्ष समाजसेवा सुधार सहकारी पतसंस्था वाकेश्वर ,अशोक जिभकाटे मंडळ कृषि अधिकारी, पहेला ,अरुण हारोडे मंडळ कृषि अधिकारी, भंडारा,गणेश शेंडे उप कृषि अधिकारी, पहेला,रोशन भोयर उप कृषि अधिकारी, पहेला राजेंद्र खंडाईत उप कृषि अधिकारी, ताबिके,पहेला यांची उपस्थिती होती.

सदर क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी,भंडारा नामदेव काशिद यांनी केले तर कार्यक्रमाचेसूत्र संचालन सतिश वैरागडे यांनी केले. 

सदर किसान गोष्टी कार्यक्रम उत्कृष्ट आणि नियोजन पूर्वक करिता तालुका कृषी अधिकारी कार्यालय,भंडारा अधिनस्त संपूर्ण क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0 Response to " "नैसर्गिक शेती: टिकाऊ उत्पादनाची गुरुकिल्ली" - अजयकुमार राऊत (प्रकल्प उपसंचालक आत्मा,भंडारा)"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article