बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडाराची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न
अॅड. सुनील डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी" या तत्वावर आधारित सत्ता वाटपातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक बेरोजगार युवकाला स्थायी रोजगार उपलब्ध करून देण्याचा पक्षाचा ठाम निर्धार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत विविध समाजातील मान्यवरांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. यामध्ये कुणबी समाजाचे हरिचंद भोयर, पवार समाजाचे नामदेव रहांगडाले, कलार समाजाचे दिलीप कटकवार, मुस्लिम समाजाचे पठाण साहेब, धोबी समाजाचे रोहित गायगवाल, तेली समाजाचे रवींद्र गभने आणि मरार समाजाचे सुभाष उपरीकर यांचा समावेश होता. त्यांनी समाजात ऐक्य आणि भाईचारा निर्माण करण्यासाठी आपला वेळ आणि योगदान देण्याची ग्वाही दिली.
बैठकीला उपस्थित मान्यवर :
जिल्हा प्रभारी चंद्रमणी गोंडाने, नामदेव ठाकरे, विक्रांत भवसागर, यादवराव बोरकर, के. एल. गजभिये, दिवाकर लिमजे, विलास नरुले, सूरजभान चौहान, जिल्हाध्यक्ष डॉ. ए. पी. के. संघरत्ने, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश लांझेवार, माजी प्रदेश सचिव दिलीप मोटघरे, जिल्हा उपाध्यक्ष महासचिव विजय वाघमारे, जिल्हा कोषाध्यक्ष धीरज गोस्वामी, यशवंत वैद्य, रंजीत नंदागवडी, रवी गजभिये, कार्तिक मेश्राम, मनोज कोटांगले, कुंजन शेंडे, अमित रामटेके, रमेश साखरे, गौतम मेश्राम, निशू गजभिये, किशोर गजभिये, स्वप्निल गजभिये, अमित तिरपुडे, गोविंद बर्वे, उमेश मेश्राम, नेमीचंद बागडे, अनिल लोणकर, आकाश वासनिक, विशाल गजभिये, जितू बोरकर, अमृत राऊत, डॉ भैया लाल मेश्राम मंगला लांजेवार, साधना बनसोड, माधुरी गजभिये तसेच माजी जिल्हाध्यक्ष पाम्बीर्द आणि विधानसभा व सेक्टरस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत संघटनात्मक कार्य, कार्यकर्त्यांचे सशक्तीकरण व आगामी योजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
0 Response to "बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडाराची जिल्हास्तरीय आढावा बैठक उत्साहात संपन्न"
एक टिप्पणी भेजें